टॉप न्यूज

राधा आमच्यासाठी पूज्यनीय, सनीचा डान्स अश्लील; मथुरेतील संतांचा ‘मधुबन’ गाण्याला विरोध

टीम लय भारी

मुंबई : सनी लिओनी ‘मधुबन में राधिका नाचे’ या तिच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या गाण्यामुळे चर्चेत आहे. सनीच्या या गाण्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना सनीचं हे गाणं आवडलं असलं तरी अनेकांनी या गाण्याला विरोध केल्याचं पाहायला मिळालं. सनीनं या गाण्यावर धम्माल डान्स केला असला तरीही तिच्या या डान्सला मथुरा येथील काही संतांनी विरोध करत, तिचा डान्स अश्लिल असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच सनीच्या गाण्यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे(Saints in Mathura oppose ‘Madhuban’ song).

सनी लिओनीच्या गाण्यावर मथुरा येथील संतांनी आक्षेप घेतला आहे. ‘सनी लिओनीनं या गाण्यावर अश्लिल डान्स केला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’ असा आरोप सनीवर करण्यात आला आहे. यासोबतच सनीच्या या व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे आणि असं न केल्यास सनीच्या विरोधात खटला दाखल करण्यात येईल असा इशाराही या संतांकडून देण्यात आला आहे.

ब्रेकअपनंतर सुष्मिता सेनची पहिली पोस्ट, कॅप्शनची चर्चा

भाऊची कमाल कुशलची धमाल, ‘पांडू’ची वारी, हिंदीवर भारी, विकेंडला जमवला कोटींचा गल्ला!

सनी लिओनीचं ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणं २२ डिसेंबरला प्रदर्शित झालं होतं. प्रदर्शनानंतर काही वेळातच हे गाणं खूप व्हायरल झालं आणि त्यावरून सनीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. या गाण्यावर सनी ज्याप्रकारे डान्स करत आहे त्याला अनेकांनी अश्लिल डान्स म्हटलं आहे. ‘राधा आमच्यासाठी पूज्यनीय आहे आणि या गाण्यामुळे विशेषतः सनीच्या डान्समुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या गाण्यावर बंदी घालावी.’ अशी मागणी केली जात आहे.

दादर स्थानकाचे छत 600 झाडांसारखे असणार!

Sunny Leone’s Madhuban music video miffs Mathura-based priests, actor threatened with legal action

‘मधुबन में राधिका नाचे’ हे एक अल्बम सॉन्ग आहे. या गाण्याच्या डान्सची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी केली आहे. हे गाणं वर्षाच्या अखेरस हिट होईल असं निर्मात्यांना वाटलं होतं. मात्र आता हे गाणं दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

9 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

11 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

11 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

13 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

13 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

14 hours ago