29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजदादर स्थानकाचे छत 600 झाडांसारखे असणार!

दादर स्थानकाचे छत 600 झाडांसारखे असणार!

टीम लय भारी

मुंबई: दादर स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. लोक चकित होतील अशा पद्धतीने या स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे – दादर स्टेशनच्या छताचे शास्त्रोक्त पद्धतीने नूतनीकरण करणे. मिळालेल्या माहितीनुसार, दादर स्थानकाचे छत टायटॅनियम डायऑक्साइडचे बनवले जाणार असून, 600 झाडांइतके प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता असणार आहे. या रसायनामुळे प्रदूषणात सामील असलेल्या वायूंमध्ये अशा काही रासायनिक प्रक्रिया होतात की त्यांचे दुष्परिणाम नगण्य राहतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असा प्रयोग भारतीय रेल्वेत प्रथमच होत आहे.(Dadar station will be like 600 trees! you will shock)

या पुनर्विकासाची ब्लू प्रिंट तयार असून, त्यामुळे दादर स्थानकाला पूर्णपणे नवे स्वरूप येणार आहे. एवढेच नाही तर स्टेशन परिसरात चांगली प्रकाश व्यवस्था, वेंटिलेशन आणि हवेची शुद्धता याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ७२४२ स्क्वेअर मीटर क्षेत्रात टायटॅनियम डायऑक्साइडचा वापर केला जाईल. स्थानकाच्या छतावर सोलर पॅनलही असणार आहेत.

ख्रिसमस, नवीन वर्षात मुंबईत स्ट्रीट शॉपिंग करताय? मग या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

नव्या वर्षांत धावत्या लोकलमध्ये मिळणार निःशुल्क वायफाय

हा प्रकल्प तयार करणाऱ्या एका अभियंत्याने सांगितले की, 1200 स्क्वेअर मीटर परिसरात टायटॅनियम डायऑक्साइड लावल्यास 100 झाडांइतकाच परिणाम होतो. येथे स्टेशनचे संपूर्ण छत या रसायनाने झाकले जाईल, ज्याचा प्रभाव 600 झाडांइतका असेल. टायटॅनियम डायऑक्साइड विषारी वायूंसह रासायनिक प्रक्रिया करून प्रदूषण नियंत्रित करते.

हे नवीन छत , दादर स्टेशनची नवीन इमारतघेईल या इमारतीमध्ये अतिरिक्त FOB असतील, जे पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडतील. स्थानकाबाहेर जाण्यासाठी या इमारतीत स्कायवॉक आणि पूल जोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या मते, “आम्हाला या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याला तत्वत: मान्यताही मिळेल, अशी आशा आहे. या इमारतीत एलिव्हेटेड पार्किंग केले जाणार असून, त्यामुळे रेल्वेला जादा उत्पन्न मिळणार आहे. ही इमारत 2000 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधली जाईल आणि त्यात बहुस्तरीय पार्किंग असेल. या इमारतीत मेल एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल ट्रेनसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.

सचिनच्या मैत्रिणीचे प्राण वाचवल्यानंतर मुंबई पोलिसांनी केलं ‘असं’ ट्वीट!

Mumbai: Dadar station roof to be remodelled using titanium oxide, blueprint set by Indian Railways

https://youtu.be/AB5-4q5SJPU

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी