28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसिनेमाभाऊची कमाल कुशलची धमाल, ‘पांडू’ची वारी, हिंदीवर भारी, विकेंडला जमवला कोटींचा गल्ला!

भाऊची कमाल कुशलची धमाल, ‘पांडू’ची वारी, हिंदीवर भारी, विकेंडला जमवला कोटींचा गल्ला!

टीम लय भारी

मुंबई : लॉकडाऊननंतर सिनेमागृहे खुली झाल्यानंतर मराठी चित्रपटांचं भवितव्य काय असेल, मोठ्या बॅनर्सच्या हिंदी चित्रपटांपुढे यांचा टिकाव लागेल का हिंदीमुळे मराठीला हव्या तशा स्क्रिन्स आणि शोज मिळतील का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते(Bhau Kadam and Kushal’s ‘Pandu’ collected crores of rupees over the weekend)

पण या सर्वच प्रश्नांना अतिशय सकारात्मक आणि सणसणीत उत्तर दिलं आहे झी स्टुडिओजच्या ‘पांडू’ चित्रपटाने. पहिल्या तीन दिवसांतच तब्बल 1.91 कोटींची कमाई ‘पांडू’ने (Pandu) केलीये.

Entertainment : इनडोअर खेळांसह चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु होणार, राज्य सरकारची अनलॉक संदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध

Happy Birthday Shatrughan Sinha | शत्रुघ्न सिन्हांचा आज 76 वा वाढदिवस, जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी

याशिवाय अनेक मल्टीप्लेक्समध्ये चालू असलेल्या हिंदी सिनेमाचे प्राईम टाइमचे शोज् कमी करून ते शोज् पांडूला देण्यात आले आहेत. यामुळे मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये एक आश्वासक चित्र निर्माण झालं असून, अनेक निर्मात्यांचा आपला मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतचा आत्मविश्वास दुणावला आहे.

 थिएटरवर झळकले ‘हाऊसफुल’चे बोर्ड!

मराठी सिनेमासाठी मल्टीप्लेक्सच्या स्क्रिन्सचा, प्राईम टाइमच्या शोजचा वाद काही नवा नाही. पूर्वी मराठी निर्मात्यांना सिनेमा प्रदर्शित करताना या अडचणींना सामोरं जावंच लागायचं. पण मागच्या काही वर्षात झी स्टुडिओजच्या चित्रपटांनी हे चित्र बदललं. मराठी सिनेमांनाही हव्या तेवढ्या स्क्रिन्स आणि प्राइम टाइम शोज् मिळू शकतात हे दाखवून दिलं.

इरफान खानला २ वर्षांपूर्वीच लागलेली मृत्यूची चाहूल; नसीरुद्दीन शाह यांचा खुलासा

Did you know that Sonalee Kulkarni gained 10 kgs for her character ‘Usha’ in Pandu?

गेली दिड वर्षे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मात्र सगळीच परिस्थिती बदलली. चित्रपट प्रदर्शनासाठी अनेक नियम आणि निर्बंध आले. या सगळ्याचा सामना मराठी चित्रपट कसा करेल असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. याच वातावरणात झी स्टुडिओजने आपला ‘पांडू’ हा सिनेमा प्रदर्शित केला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपासून गावागावांतही अनेक ठिकाणी पांडूने हाउसफुल्लचे बोर्ड झळकवले.

प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

‘पांडू’ चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघण्यासाठी ‘पांडू’ची टीम पुण्यात चित्रपटगृहांना भेट देण्यासाठी गेली होती. यावेळी त्यांना दुर्गा शिंदे नावाच्या 72 वर्षीय महिला प्रेक्षक भेटल्या, ज्या खास नाशिकवरून अगदी पहाटे निघून ‘पांडू’च्या टीमला भेटण्यासाठी आल्या होत्या. भाऊ आणि कुशलला भेटून त्या खूप भावुकही झाल्या.

त्यांना ‘पांडू’ खूप आवडला. पांडू आणि महादूची जोडी धम्माल असून, या दोघांनी आपल्याला खूप हसवल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, नाशिकला परत जाऊन आपण अजून एकदा ‘पांडू’ बघणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
चित्रपट बघून कोल्हापूरचे अमित पाटील हे प्रेक्षक म्हणाले की, आम्ही सहकुटुंब हा सिनेमा बघायला आलो होतो. खूप दिवसांनंतर आम्ही एवढं मनसोक्त हसलोय. सर्व कलाकारांनी आपापलं काम फार निगुतीनं केलंय.

भाऊ आणि कुशलच्या जोडीने धम्माल उडवून दिली आहे. तर, अमरावतीची राणी साळवी हा कॉलेजवयीन तरुणी म्हणाली की, आमच्या ग्रुपने आधीच ठरवलं होतं की. हा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा. आम्ही खूप एन्जॉय केला आणि ही धमाल अनुभवायला आम्ही पुन्हा एकदा येऊ हे नक्की.

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडगोळीचा अफलातून अभिनय सोबतीला सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळीसारख्या गुणी अभिनेत्रीच्या कसदार भूमिका… प्रविण तरडे आनंद इंगळेसारखे कसलेले सहकलाकार, थिरकायला लावणारं संगीत आणि विजू माने यांचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, या सगळ्या दिग्गजांच्या योगदानामुळे ‘पांडू’सारखी दर्जेदार कलाकृती तयार झाली.

हिंदी चित्रपटांनाही तगडी टक्कर!

समीक्षकांनीही पांडूचं कौतुक केलं आणि प्रेक्षकांनीही आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. या सगळ्याचा परिपाक म्हणजेच पहिल्या तीन दिवसांतच पांडूने कोटी कोटी उड्डाणे घेत दोन कोटीच्या जवळ कमाई केली.

यासोबतच मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, डोंबिवली, सांगली, कराड कोल्हापूर, सोलापूर, चंद्रपूर, औरंगाबाद याठिकाणी हिंदी सिनेमाचे शोज काढून ‘पांडू’चे शोज् वाढवण्यात आले आहेत. येणाऱ्या दिवसांतही ‘पांडू’ची ही घोडदौड अशीच कायम राहिल आणि तो अजून जास्त कमाई करेल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी