टॉप न्यूज

शिंदे सेनेच्या आमदाराच्या नॅनो बुद्धीला झाला अल्झायमर; भूमिका बदलून पिसाळल्यागत बरळू लागले!

“राज्यातील भाजप नेते हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे वागू लागले आहेत,” असे अवघ्या काही दिवसांपूर्वी बरळणाऱ्या शिंदे सेनेच्या एका आमदाराच्या नॅनो बुद्धीला जणू सध्या अल्झायमर झाला आहे. (Shinde Sena MLA Barking Dog) त्यामुळे आपल्या आधीच्या बेताल बडबडीचे विस्मरण झालेला हा आमदार भूमिका बदलून पिसाळल्यागत बरळू लागला आहे.

अल्झायमरबाबत सांगायचे तर, हा मेंदूशी संबंधित आजार आहे. त्यात हळूहळू मेंदूच्या पेशी नष्ट होतात. थोडक्यात, हा आजार म्हणजे ‘विसरण्याचा रोग’आहे. अलाईस अल्झायमर याने हा आजार शोधून काढला. त्यावरून त्या रोगाला अल्झायमर म्हटले जाऊ लागले. आता हा आजार शिंदे सेनेतील बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांना जडला आहे की काय, अशी त्यांची लक्षणे आणि वर्तन दिसू लागले आहे.

‘संजय राऊत यांनी पिसाळलेल्या कुत्र्याचे इंजेक्शन घेतले आहे,’ अशी बेताल बडबड काल गायकवाड यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांसामोर चेकाळून केली. मात्र, त्यांनी अलीकडेच केलेल्या अशाच बेताल विधानांचे त्यांना विस्मरण झाले. आमदार पदावर असलेले गायकवाड हे नेहमीच आपल्या पदाच्या मर्यादांचे भान विसरून पिसाळल्यागत भाषेचा वापर करीत असतात. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याशिवाय त्यांना दुसरे काही सुचतच नाही. समजा संजय राऊत यांनी इंजेक्शन घेतले असेलही तर तो पिसाळलेला कुत्रा कोण, ज्याचे इंजेक्शन देण्यात आले? हा प्रश्नच आहे.

संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच “राज्यातील भाजप नेते हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे वागू लागले आहेत,” असे म्हटले होते. भाजप नेते अनिल बोंडे यांच्याकडे त्यांचा रोख होता. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी भाजपच्या नेत्यांना पिसाळलेले कुत्रे म्हटले होते. गायकवाड म्हणाले होते, “शरद पवार साहेब आणि त्यांच्या कामाची उंची यांना (भाजपवाल्यांना) कधीच समजणार नाही. महाराष्ट्रात पवार साहेबांनी शेतकऱ्यांना उभे केले, शेतीसाठी सिंचनाची सोय केली, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून दिले. केंद्रात कृषी मंत्री झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांचे सातबारा त्यांनी कोरे केले. गुणरत्न सदावर्ते याच्या सांगण्यावरून एसटी कर्मचाऱ्यांचा दारुडा गट पवार साहेबांच्या घरावर हल्ला करतो. हे नामर्दाचे काम होते. गुणरत्न सदावर्ते कोणाचा कुत्रा आहे, ते माहिती आहेच ना!”

हे सुद्धा वाचा : 

कोश्यारी, लोढा यांच्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी तोडले अकलेचे तारे !

तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, विधानसभेत पुन्हा गदारोळ

राऊतांनी नामर्द, षंढ सरकार म्हणताच, कन्नडिंगांच्या माजाविरोधात शेपूट घालून बसलेले राज्याचे मंत्री बोलण्यात दाखवू लागले मर्द बाणा!

आता ही पूर्वीच्या पिसाळलेल्या भाषणाची स्क्रिप्ट संजय गायकवाड यांनी भाजपवाल्यांचे नाव काढून संजय राऊत यांच्या नावे चिपकविली आहे. मुळातच शिंदेसेनेतील नेत्यांकडे विचारांचे दारिद्रय आहे. बुद्धी मायक्रो नॅनो असल्याने आहे त्याच स्क्रिप्ट ही मंडळी फिरवून-फिरवून, आलटून-पालटून वापरतात. स्क्रिप्टशिवाय या मंडळींना काही बोलताच येत नाही. त्यात अल्झायमरचा प्रभाव! एकूणच धुमाकूळ घालणाऱ्या रेडयांप्रमाणे शिंदे गटातील काही आमदार उधळले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आवरावे; हवे तर कामाख्या मंदिरात जाऊन शांती करून यावे, अशी उपहासाने चर्चा सुरू आहे.

Shinde Sena MLA Barking Dog, Comment on Sanjay Raut, Sanjay Gaikwad Buldana
विक्रांत पाटील

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

7 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

7 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

8 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

8 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

10 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

10 hours ago