व्हिडीओ

Video : पहिल्याच सामन्यात धोनीला बोल्ड करणारा भारताचा बुम-बुम

भारतीय संघाचा कॅप्टन कुल अर्थात महेंद्रसिंग धोनी याचे चाहते काही कमी नाहीत. 2016 आणि 2017 साली आयपीएलमधून चेन्नई सुपर किंग्ज संघाला बॅन करण्यात आलं होतं. यावेळी धोनी पुण्याच्या संघाकडून खेळायचा तेव्हा हजारो चेन्नई फॅन ट्रेन भरून पुण्यात सामना बघायला यायचे. 2018 मध्ये जेव्हा चेन्नई पुनरागमन करणार होती त्यावेळी धोनीचा फक्त सराव बघायला स्टेडियमवर लाखो लोक उपस्थित राहत होते. 2015 मध्ये विजय हजारे ट्रॉफीच्या दरम्यान गुजरात विरुद्ध झारखंड असा सामना खेळवला गेला. प्रेक्षकांचा लाडका धोनी मैदानात फलंदाजीसाठी आला. सगळीकडे फक्त एकच आवाज घुमत होता धोनी-धोनी…. प्रेक्षकांचा उत्साह शिगेला होता. धोनी पहिला बॉल खेळायला उभा राहिला आणि समोरच्या गोलंदाजावर प्रेशर वाढलं. पण एवढ्या प्रेशर सिच्यूएशनमध्ये सुद्धा त्या गोलंदाजाने एक उत्कृष्ट असा यॉर्कर टाकला आणि पहिल्याच चेंडूवर धोनीचा बळी घेतला.

यानंतर संपूर्ण मैदानात शांतता पसरली. बॉलर थेट क्रिझकडे बघत स्तब्ध उभा राहिला. त्याला धोनीच्या विकेटचा आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटतं होतं. सामना संपला दोन्ही संघ आपापल्या ड्रेसिंग रूममध्ये परतले. तेवढ्यात गुजरातच्या ड्रेसिंग रूममध्ये एक चिठ्ठी आली. धोनीला त्या गोलंदाजाला भेटायचंय. त्यानंतर संपूर्ण गुजरातचा संघ झारखंडच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. तो नवखा बॉलर मान खाली घालून उभा होता. धोनी बसल्या जागेववरून उठला. हातात एक बॉल घेतला. त्या बॉलवर धोनीने आपली सही केली आणि त्या बॉलरकडे गेला. स्वतःची सही केलेला बॉल धोनीने त्या बॉलरला भेट दिला आणि फक्त एक वाक्य बोलला “वेल बोल्ड..” बॉलरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि या घटनेच्या अवघ्या दोन महिन्यांतच तो बॉलर धोनीच्या नेतृत्वात भातीय संघासाठी खेळू लागला. त्या बॉलरने त्यानंतर अनेक यॉर्कर्स टाकले अनेक विक्रम केले. अनेक विकेट्सही मिळवल्या पण विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात धोनीली टाकलेला यॉर्कर अन् त्याची घेतलेली विकेट बॉलरच्या आयुष्यातील सर्वात महत्त्तवाचा क्षण बनला. त्या बॉलरचं नाव म्हणजे बुम बुम अर्थात जसप्रीत बुमराह.

धोनीने त्याच्या कॅपटन्सी करिअरमध्ये अनेक खेळाडू घडवले त्यातीलच एक खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह. जो आज भारताच्या बॉलिंग लाईनअप मधला सर्वात महत्त्वाचा बॉलर ठरला आहे. जर बुमराह त्या दिवशी धोनीला यॉर्कर टाकायला घाबरला असता तर तो आज जगातला सर्वात मोठा गोलंदाज बनूच शकला नसता. अन् धोनीने बुनमराहने मारलेला यॉर्कर मनाला लावला अता तर धोनी जगातला सर्वोत्कॉष्ट कॅप्टन बनला नसता.

पूनम खडताळे

Recent Posts

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

9 mins ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

36 mins ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

1 hour ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

1 hour ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

11 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

12 hours ago