जागतिक

इंडोनेशिया भुकंपाने हादरले; 46 जणांचा मृत्यू

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि जावा बेटावर सोमवार (21 नोव्हेंबर) रोजी तीव्र भूकंप झाला. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता सुद्धा या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. भूकंप येवढा तीव्र होता की भूकंपामुळे 46 जणांचा मृत्यू झाला, तर 300 लोक जखमी झाले. समोर आलेल्या माहीती नुसार भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी होती. त्यामुळे तेथील अनेक इमारतींचे नुकसान होउन बहुतेक ठिकाणी भूस्खलन सुद्धा झाले आहे.

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनी हा भूकंप झाला. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून अनेक नागरीक भयभीत झाले होते. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचे धक्के पहिल्यांदा पश्चिम जावाच्या सियांजूर प्रदेशात दिसुन आले. त्यानंतर राजधानी जकार्तापर्यंत सुद्धा भुकंपाचे धक्के जाणवले. या दरम्यान परिसरातील अनेक रहिवासी घाबरुन रस्त्यावर पळताना दिसुन आले.

जकार्ता येथे झालेल्या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या बहुतांश लोकांचा मृत्यू हा इमारतींच्या अवशेषांमध्ये सापडुन झाला. भूकंपात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेदरम्यान आरोग्य सुविधांच्या अभावामुळे अनेक पिडीतांना स्थानिकांकडून पिकअप ट्रक आणि मोटरसायकलवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांना रुग्णालयात दाखल केले, मात्र भूकंपानंतर शहरातील रुग्णालयात वीज नव्हती ज्यामुळे डॉक्टर पीडितांवर उपचार करू शकले नाहीत, त्यामुळे अनेक पिडीतांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. अद्यापही रुग्णालयांना वीज पूरवठा कमी प्रमाणात होत असल्याने आणि रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे येथील अधिका-यांना अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे.

भारतातही जाणवले भूकंपाचे धक्के
गेल्या काही दिवसांपासून भारतात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी येथे मध्यरात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल एवढी मोजली गेली होती. अरुणाचल प्रदेशातही बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले होते. सकाळी साधारण 9.55 वाजण्याच्या सुमारास हे भूकंपाचे हे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 3.7 इतकी होती. त्याच बरोबर गुजरातमध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी होती.

हे सुद्धा वाचा

Rasana Founder : ‘रसना’ला शरबतचा नंबर 1 ब्रँड करणारे अरीज खंबाटा कालवश

Zakir Naik : 5 देशांत बंदी असलेला झाकीर नाईक ‘फिफा’चा चीफ गेस्ट! जगभरातून टीकेची झोड

Rishabh Pant Urvashi Rautela : पंत-उर्वशीच्या नात्याबाबत शुभमन गिलने केला मोठा खुलासा! म्हणाला,’त्याला फरक पडत नाही…’

जपानमध्ये सुद्धा भूकंपाचे जोरदार धक्के
जपानमध्ये सुद्धा सोमवारी( 21 नोव्हेंबर) रोजी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. जपानमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तेथील अनेक घरांतील वस्तूही खाली पडल्या होत्या. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

12 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

12 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

12 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

13 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

15 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

16 hours ago