26 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरमुंबईRasana Founder : 'रसना'ला शरबतचा नंबर 1 ब्रँड करणारे अरीज खंबाटा कालवश

Rasana Founder : ‘रसना’ला शरबतचा नंबर 1 ब्रँड करणारे अरीज खंबाटा कालवश

रसना कंपनीचे संस्थापक अरीज खंबाटा (85) यांचे शनिवारी निधन झाले.खंबाटा हे अरीज खंबाटा बेनेव्होलेंट ट्रस्टचे अध्यक्ष देखील होते. याशिवाय ते WAPIZ म्हणजेच वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्तीचे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे माजी अध्यक्ष राहिले होते. अरीज खंबाटा हे लोकप्रिय घरगुती पेय पदार्थ रसनामुळे नावारूपास आले होते.

देशभरातील प्रसिद्ध अशा रसना ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा हे कालवश झाले आहेत. याबाबतची माहिती रसना ग्रुपकडून एका निवेदना,मार्फत देण्यात आली आहे. अरीज खंबाट (वय वर्ष 85) यांचे शनिवारी निधन झाले. ते अरिज खंबाट्टा बेनेव्होलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्षही होते. याशिवाय, ते WAPIZ म्हणजेच वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्तीचे माजी अध्यक्ष आणि अहमदाबाद पारसी पंचायतीचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिले होते. खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यवसाय आणि समाजाच्या सेवेद्वारे सामाजिक विकास कार्यात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशी माहिती निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

18 लाख रिटेल आउटलेटवर विकला जातो रसना
खंबाटा हे लोकप्रिय घरगुती पेय पदार्थ रसनामुळे सर्वाधिक प्रसिद्ध झाले. देशातील 18 लाख रिटेल आउटलेटवर रसनाची विक्री करण्यात येते. रसना ही आता जगातील सर्वात मोठी पावडरच्या माध्यमातून शीतपेय बनविण्याच्या बाबतची उत्पादक कंपनी बनली आहे. खंबाटा यांनी 1970 च्या दशकात महागड्या शीतपेयाला पर्याय म्हणून रसनाची निर्मिती केली. त्यानंतर काही वेळातच रसना प्रसिद्ध झाला. सध्या जगातील ६० देशांमध्ये रसनाची विक्री केली जाते.

हे सुद्धा वाचा

Shraddha Murder Case : उत्तर प्रदेशातही श्रद्धा हत्याकाडांची पुनरावृत्ती; धक्कादायक प्रकार उघडकीस

Revenue Department : जमीनजुमल्याच्या किचकट समस्यांची उत्तरे एका क्लिकवर; महसूल विभागाने केले लोकांच्या 5000 समस्यांचे निराकरण

Solapur Mahanagarpalika : महिला आयुक्तांनी स्वीकारला सोलापूर महापालिकेचा पदभार

अहमदाबादचे पहिले सर्वोत्तम पारशी म्हणून निवड
उद्योग आणि समाजसेवेच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल खंबाटा यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना भारताचे राष्ट्रपती होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदक, वेस्टर्न स्टार, समरसेवा आणि संग्राम पदके मिळाली आहेत. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांना वाणिज्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुजरातचे सर्वात मोठे करदाते म्हणून राष्ट्रीय तिजोरीत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना वित्त मंत्रालयाने सन्मान पत्र देखील दिले. ‘अहमदाबादचे पहिले सर्वोत्कृष्ट पारसी’ म्हणूनही अरीज खंबाटा यांची निवड करण्यात आली.

थंड पेय फक्त एक रुपयात
खंबाटा यांनी जगप्रसिद्ध ‘रसना’ ब्रँड तयार केला. हे फळांपासून बनवलेले कोरडे/केंद्रित शीतपेय केवळ रु. 1 च्या परवडणाऱ्या किमतीत विक्री करण्यात आले. ज्यामुळे अल्पावधीतच रसना हे पेय लोकांच्या घरात आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये शीतपेय म्हणून देण्यात येऊ लागले. रसना ग्रुपच्या मते, ते लाखो भारतीयांची तहान जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक तत्वांनी भागवते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!