जागतिक

यंदा भारत होणार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश; गेल्या 60 वर्षात प्रथमच घटली चीनची लोकसंख्या!

भारतासाठी चिंतेची बातमी आहे. 1961 नंतर, गेल्या 60 वर्षात प्रथमच घटली चीनची लोकसंख्या! त्यामुळे चीनला मागे टाकून यंदा भारत होणार जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, असे चित्र दिसत आहे. (India To Become Worlds Most Populated Country Chinas Population Declined For First Time Since 1961) चीनमधील लोकसंख्या घसरणीला लागणार असून दुसरीकडे भारतात मात्र लोकसंख्येचा विस्फोट होणार असल्याने भारत, चीनसह जगभराचा समतोल बिघडणार आहे. उभय देशांसह जगाचे अर्थकारण आणि इतर क्षेत्रातही त्यांचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

चीनकडून लोकसंख्या नियंत्रणांच्या अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे सहा दशकांत प्रथमच गेल्या वर्षी चीनची लोकसंख्या घटली. आता चीनी नागरिकांच्या लोकसंख्येत दीर्घ कालावधीच्या घसरणीची सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर आणि उर्वरित जगावरही गंभीर परिणाम होईल.

चीनमधील महादुष्काळाचे शेवटचे वर्ष असलेल्या 1961 नंतरची लोकसंख्येतील सर्वात मोठी घट गेल्या वर्षी नोंदविली गेली आहे. चीनच्या राष्ट्रीय लोकसंख्या आकडेवारीनुसार, देशाची लोकसंख्या वर्षभरात अंदाजे साडे आठ लाखांनी कमी झाली आहे. याक्षणी चीनची लोकसंख्या सुमारे 141 कोटी आहे. त्यामुळे, यंदा वर्षअखेर, भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकेल.

चीन-भारत लोकसंख्या तुलना (2050 अंदाज)

संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांच्या मते, 2050 पर्यंत चीनची लोकसंख्या सुमारे 11 कोटीने कमी होईल. चीनने यापूर्वी 2019 मध्ये वर्तवलेल्या अपेक्षित घटीपेक्षा ती प्रत्यक्षात तिप्पट असेल. त्यामुळे चीन श्रीमंत होण्याआधीच वृद्ध होईल आणि अर्थव्यवस्था मंदावेल, या भीतीने चीनमधील लोकसंख्याशास्त्रज्ञ चिंतेत आहेत. वाढत्या आरोग्य आणि कल्याण खर्चामुळे देशाचा महसूल कमी होऊन सरकारी कर्ज वाढण्याची भीती आहे.

“चीनचे लोकसंख्याशास्त्रीय आणि आर्थिक दृष्टीकोन अपेक्षेपेक्षा खूपच खराब आहेत. त्यामुळे चीनला आपली सामाजिक, आर्थिक, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणे यात बदल करावे लागतील,” असे जनसांख्यिकी अभ्यासक, यी फुक्सियान यांनी सांगितले. चीनमधील कमी होत असलेली श्रमशक्ती आणि उत्पादनातील मंदीमुळे भविष्यात अमेरिका व युरोपसह जगभरात वस्तूंचे दर वाढून महागाईचा भडका उडण्याची शक्यताही फुक्सियान यांनी व्यक्त केली आहे.

अपेक्षेप्रमाणेच, लोकसंख्येबाबत चीनला मागे टाकून भारत आता पुढे सरकत आहे. मात्र, त्यामुळे अनेक गंभीर आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

चीनमध्ये 2022 साली, प्रति 1,000 लोकांमध्ये 6.77 असा सर्वात कमी जन्मदर नोंदवला गेला. 2021 मध्ये, चीनमध्ये प्रति हजारी 7.52 जन्मांची नोंद झाली. दुसरीकडे, 1974 मधील सांस्कृतिक क्रांतीदरम्यान चीनमध्ये हजार लोकांमागे 7.37 मृत्यू असा सर्वाधिक मृत्यू दर होता. त्याखालोखाल 2021 मध्ये 7.18 मृत्यूदर नोंद झाला.

हे सुद्धा वाचा :

मला चार मुले झाली कारण काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रणासाठी काहीच केले नाही : भाजप खासदार रवि किशन

अरे व्वा ! भारतीयांनी वाढवली ऑस्ट्रेलियातील लोकसंख्या

political party : 138 कोटी लोकसंख्येच्या देशात सुमारे 2044 राजकीय पक्ष

चीनमध्ये 1980 ते 2015 दरम्यान एकुलते एक मूल धोरण लागू करण्यात आले. त्याचबरोबर महागड्या शालेय खर्चामुळेही अनेक चिनी लोकांनी एकापेक्षा जास्त मुले होऊ दिली नाहीत. काहींनी तर मूलच होऊ दिले नाही. लोकसंख्येतील घटीचे ते एक महत्त्वाचे कारण ठरले. त्यात कोविड मृत्युंची भर पडली. चीनच्या कठोर शून्य कोविड धोरणामुळे तीन वर्षांपासून देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय दृष्टिकोनाचे आणखी नुकसान झाल्याचे तज्ञांचे मत आहे.

India To Become Worlds Most Populated Country, Chinas Population Declined For First Time Since 1961, गेल्या 60 वर्षात प्रथमच घटली चीनची लोकसंख्या, एक मूल धोरण

 

 

विक्रांत पाटील

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

27 mins ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

2 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

2 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

2 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

11 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

12 hours ago