31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजमोठी बातमी : उद्या बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, घोडेबाजार रोखण्यासाठी...

मोठी बातमी : उद्या बहुमत सिद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, घोडेबाजार रोखण्यासाठी निकाल

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :  बुहमत चाचणीचे आयोजन ताबडतोब करण्यात यावे. त्यासाठी उद्या तातडीचे विधानसभेचे अधिवेशन बोलविण्यात यावे, असा महत्वाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस – अजित पवार सरकारची अग्निपरीक्षा २४ तासांवर येऊन ठेपली आहे.

न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, सुरूवातीला सगळ्या आमदारांना शपथ देण्यात यावी. हंगामी अध्यक्षांमार्फत ही शपथ द्यावी. आमदारांचा शपथविधी ५ वाजेपर्यंत उरकण्यात यावा. त्यानंतर लगेचच बहुमत चाचणी घेण्यात यावी. मतदानाची प्रक्रिया ही गुप्त पद्धतीने घेऊ नये. मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे.

न्यायमूर्ती रमन्ना यांनी हा निकाल अवघ्या पाच मिनिटांतच वाचून दाखवला. लोकशाही मुल्यांची जपणूक व्हायला हवी. घोडेबाजार रोखला जायला हवा. त्या दृष्टीने आम्ही हा अंतरिम आदेश देत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दोन्ही पक्षांनी जे युक्तीवाद केले त्यातून विधीमंडळ व न्यायालयाच्या अधिकारांबाबत बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण त्याची दखल सध्या तरी आम्ही घेणार नाही. परंतु घोडेबाजार रोखण्यासाठी आम्ही हा निकाल देत असल्याचे न्यायाधिशांनी नमूद केले आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या पक्षनेत्यांचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेतील : विधीमंडळ सचिव

‘राज्यपालांनी संविधानाचा खेळखंडोबा केला, संविधानाच्या बारा वाजवल्या’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी