डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची आता राज्यभर अंमलबजावणी केली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोटनांद्रा व डोईफोडा येथे मका संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. याशिवायही इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळ निर्णय : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या व्याप्तीत वाढ
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची आता राज्यभर अंमलबजावणी
राज्याचे नवीन माहिती-तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत धोरणाला मंजुरी . 35 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट
फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन ! : राज्याचे नवीन एकात्मिक, शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 ला मान्यता. 5 लाख रोजगार निर्माण करणार
बृहन्मुंबई क्षेत्रातील नागरी नूतनीकरण योजनेत क्लस्टर विकासासाठी फंजिबल एफएसआय, तसेच विकास अधिभारात 50 टक्के सवलत
बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पासाठी 1710.84 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला मंजुरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोटनांद्रा व डोईफोडा येथे मका संशोधन केंद्र
केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने राज्यात नवीन कामगार नियम तयार करणार
लाखो कामगारांचे हित जपणाऱ्या नवीन नियमांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
राज्य मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद.. (३०/५/२०२३) https://t.co/EeKeX8sxLd
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 30, 2023
हे सुद्धा वाचा / पाहा :
गिरीश महाजन गेले योगी आदित्यनाथ चरणी शरण
मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरता, तुमच्यात एकवाक्यता नाही का ? अजित पवारांचा सवाल
मंत्र्यांचे चोचले पुरविण्यासाठी होणार 1,000 कोटींची उधळपट्टी !
ग्रेड पे 7600 रुपये असलेल्या आणखी 105 पदांना मान्यता
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत इंजिनिअरिंग, फार्मसी कॉलेजमधील नव्या 105 पदांना मान्यता
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत ‘आई’ महिला केंद्रीत पर्यटन धोरण
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ केंद्राच्या ₹6000 सोबत राज्याचे ₹6000 अतिरिक्त
आता शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीकविमा !
लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी सर्वसमावेशक पीक विमा योजना