30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeफोटो गॅलरीपावसात फिरायला जायचंय ? पण ठिकाण सापडतं नाही... मग हे वाचाच

पावसात फिरायला जायचंय ? पण ठिकाण सापडतं नाही… मग हे वाचाच

पाऊस सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतं ते पावसाळी सहलीचे. उंचच उंच डोंगरावरून धबधबे आणि कोसळणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर घेण्यासाठी सगळ्यांची रेलचेल सुरू होते. दाट धुक्याने आणि नटलेल्या हिरवळीने ही वनराई हौशी पर्यटकांचे स्वागतच करत असते. मग आपण तरी मागे का राहायचे. अशीच काही ठिकाणे आहेत ती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तिथं तुम्ही तुमची सुट्टी अगदी आनंदात घालवू शकता.

rainy season waterfall picnic spot near by mumbai

  1. जुम्मापट्टी हा नेरळ आणि माथेरान दरम्यान असलेला धबधबा आहे. हा धबधबा मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर आहे. पावसाळा सुरु झाला की आठ दिवसात जुम्मापट्टी धबधबा वाहू लागतो. येथे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

rainy season waterfall picnic spot near by mumbai

2.  पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून माळशेज धबधबा हा प्रसिद्ध आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून माळशेज घाटापर्यंत सुमारे 85 किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर द-याचा परिसर पर्यटकांना वेड लावतो.

rainy season waterfall picnic spot near by mumbai

3. बदलापूरमधील कोंडेश्वर हा धबधबा खूप प्रसिदध आहे. बदलापूर स्टेशन वरुन ५-६ किलोमीटर अंतरावर आहे. हा धबधबा दाट जंगलाच्या मध्यभागी आहे. सभोवतलाचा परिसर अतिशय सुंदर असून मनमोहक आहे.

rainy season waterfall picnic spot near by mumbai

4. पांडवकडा हा मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला खारघरमधील धबधबा आहे. कड्यावरुन कोसळणारे पाणी आणि कर्कश आवाज हा भीतीदायक वाटतं असतो.

rainy season waterfall picnic spot near by mumbai

5. दाभोसा आणि हिरडपाडा हा पालघरमधील जव्हार या ठिकाणी आहे. जव्हार तालुक्यापासून १५ ते २० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत दाभोसा आणि हिरडपाडा हे धबधबे आहेत. या धबधब्याच वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा बाराही महिने सुरु असल्यानं पर्यटकांना या पर्यटन स्थळाचा आनंद घेता येतो.

rainy season waterfall picnic spot near by mumbai

6. देवकुंड हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात धबधबा आहे. भिरा गावात पोहचल्यानंतर अंदाजे दीड ते दोन तासांच्या ट्रेक नंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते. मुंबईपासून १२५ किलोमीटर वर आहे. देवकुंड धबधब्याला ताम्हिणी घाट म्हणून सुध्दा ओळखले जाते. येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.

पावसात सहलीला जाण्याचा प्लॅन करता ना. मग आर्वजून या ठिकाणी भेट द्या. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणालाही भेट द्या.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी