34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस रस्त्यावर उतरणार, प्रियांका गांधींचे निर्देश

काँग्रेस रस्त्यावर उतरणार, प्रियांका गांधींचे निर्देश

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सुधारित नागरिक कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. भाजपप्रणीत केंद्र सरकारविरोधीत सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आपणही आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे’ असे मत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रियांका गांधी यांनी हे मत व्यक्त केले आहे.

यासंदर्भात काँग्रेसच्या वतीने पक्षाचे विविध राज्यातील मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांना सुचना केल्या जातील. आपापल्या राज्यात शांततापूर्ण आंदोलने करण्याबाबत सुचना करण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला आहे. धर्माच्या आधारे कोणत्याही नागरिकांमध्ये भेदभाव करू नये हा भारतीय राज्य घटनेचा गाभा आहे. परंतु पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान येथील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख या धर्मातील लोकांवर अन्याय झाल्याने भारताकडे शरण आलेल्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय भाजपने बहुमताच्या जोरावर घेतला आहे. यामध्ये मुस्लिम समाजातील लोकांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे.

मुस्लिम समाजाविरोधात हिंदूंना जास्तीत जास्त भडकावयचे आणि आपली व्होट बँक मजबूत करायची अशी नरेंद्र मोदी – अमित शाह यांचे धोरण आहे. या धोरणाच्या अनुषंगानेच धर्मा – धर्मांमध्ये विष कालवण्याचे काम मोदी – शाह जोडी करीत असल्याचा आरोप सामान्य लोकांमधून होऊ लागला आहे. त्यामुळेच देशभरात जोरदार आंदोलन सुरू आहे.

भाजपविरोधात उसळलेल्या या संतापाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक होण्याची भूमिका घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री स्वरा भास्करचा भाजपवर नाव न घेता घणाघात, महंमद अली जीनांची दिली उपमा

‘भाजपला भारत हिंदू राष्ट्र बनवायचे आहे, पण देशवासियांना हे मान्य नाही’

भाजप सरकारच्या काळातील ‘हा’ शैक्षणिक निर्णय बाळासाहेब थोरातांनी केला रद्द

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी