32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रबच्चू कडू यांच्या कार्यालयातील अधिकारी सुद्धा ‘कडू’च

बच्चू कडू यांच्या कार्यालयातील अधिकारी सुद्धा ‘कडू’च

टीम लय भारी

मुंबई :  राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयात चार अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी दोन अधिकाऱ्यांची आडनावे ‘कडू’ आहेत. स्वतः मंत्र्यांचे आडनाव ‘कडू’, आणि दोन अधिकाऱ्यांची नावे सुद्धा ‘कडू’च आहेत. त्यामुळे कडू यांच्या इवल्याशा कार्यालयात तीन ‘कडूं’च्या पाट्या लक्ष वेधून घेत आहेत.

जीवन कडू आणि दत्तात्रय कडू – पाटील अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोघेही विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून कार्यरत आहेत. जीवन कडू हे यापूर्वी माजी मंत्री प्रवीण पोटे – पाटील यांचे ओएसडी म्हणून कार्यरत होते. दत्तात्रय कडू – पाटील यांनी तर वीस वर्षांहून अधिक काळ विविध मंत्र्यांकडे ओएसडी म्हणून काम केले आहे. चंद्रकांत हंडोरे, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे या मंत्र्यांकडे दत्तात्रय कडू – पाटील यांनी काम केले आहे.

विशेष म्हणजे, या दोन्ही अधिकाऱ्यांचे आडनाव जरी ‘कडू’ असले तरी मंत्र्यांप्रमाणेच जनतेसाठी मात्र ते ‘गोड’ आहेत. मंत्री बच्चू कडू यांची जनतेमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यालयात लोकांचा सतत राबता असतो. या लोकांचे शंका समाधान करण्याचे काम बच्चू कडू व त्यांचे अधिकारी करीत असतात. जीवन कडू व दत्तात्रय कडू पाटील यांना मंत्रालयातील कामांचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे ते आपल्या अनुभवाचा फायदा सामान्य लोकांना करून देत असतात.

या दोन्ही अधिकाऱ्यांची आडनावे ‘कडू’ असली तरी ते बच्चू कडू यांचे नातलग नाहीत. बच्चू कडू यांनी या दोघांनाही त्यांची कार्यक्षमता आणि गुणवत्ता या आधारेच आपल्या कार्यालयासाठी निवड केली आहे. आडनावातील साधर्म्य हा केवळ योगायोग असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

VIDEO : मंत्री बच्चू कडूंनी मंत्रालयाच्या व्हरांड्यातच जनतेची ऐकली गाऱ्हाणी

..अन्यथा पुन्हा मोर्चा काढू, बच्चू कडूंचा प्रहार!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी