31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमुंबई१५ डबा लोकल योजनेची ढकलगाडी

१५ डबा लोकल योजनेची ढकलगाडी

टीम लय भारी

मुंबई : प्रवासी क्षमता वाढवणे आणि लोकल प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेवर (Train) कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत धीम्या मार्गावर १५ डबा लोकल प्रकल्प राबवण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. मात्र दोन वर्षांत सर्वेक्षण आणि प्रकल्पाचा नियोजित खर्च किती यावरच काम सुरू असून प्रत्यक्षात प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते चार वर्ष लागतील. त्यामुळे मध्य रेल्वे उपनगरीय प्रवाशांचे सुकर प्रवासाचे स्वप्न धूसरच झाले आहे.

मध्य रेल्वेवर बारा वर्षांपूर्वी सीएसएमटी ते कल्याणपर्यंत एक पंधरा डबा जलद लोकल सुरू करण्यात आली. यासाठी सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकातील जलद मार्गावरील फलाटांची लांबी वाढवण्यात आली. या लोकल गाडीमुळे प्रवासी क्षमता वाढतानाच गर्दीच्या प्रवासातून थोडाफार दिलासा मिळू लागला. सध्या १५ डबा लोकलच्या दररोज १६ फेऱ्या होतात.

कल्याणपर्यंत पंधरा डबा लोकल सेवेचा विस्तार कर्जत, कसारापर्यंत करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्यासाठी कल्याणपुढील सर्व फलाटांची लांबी वाढवतानाच काही ठिकाणी यार्डची कामे, सिग्नल, ओव्हरहेड वायरसह अन्य तांत्रिक कामे करावी लागतील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे १५ डबा लोकल गाडय़ांची संख्या वाढल्यावर फे ऱ्या वाढल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

कल्याण ते कर्जत मार्गावर १५ डबा प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) आणि कल्याण ते कसारा मार्गावर १५ डबाचे काम मध्य रेल्वेकडून के ले जाणार आहे. या दोन्ही मार्गावरील प्रकल्पाच्या खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे लवकरच मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी निविदा काढली जाईल. त्यामुळे कल्याणनंतर १५ डबा चालवण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी तीन ते चार वर्षे लागणार आहे.

सध्या १५ डब्याच्या पाच लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात असून त्याच्या ५४ फे ऱ्या होतात. अंधेरी ते विरार धीम्या मार्गावर १५ डबा लोकलचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. अंधेरीनंतर धीम्या मार्गावर १५ डबा लोकल चालवण्यासाठी सर्व फलाटांची लांबी वाढवण्यासह महत्त्वाची कामे वेगाने पूर्ण के ली जात असून येत्या मार्चनंतर पश्चिम रेल्वेवर १५ डबा लोकल गाडय़ांची व फे -यांची संख्या वाढविण्यात येतील.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी