33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंनी देखण्या गावाचे केले कौतुक

आदित्य ठाकरेंनी देखण्या गावाचे केले कौतुक

टीम लय भारी

नाशिक :- एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाचे नेहमी कौतुक केले पाहिजे. त्याबद्दल त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. हीच बाब लक्षात घेऊन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पिंपळगावाशी ऑनलाइन संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन केले. (Aditya Thackeray appreciated the beautiful village).

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पिंपळगावाला पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्रामसेवकांचे अभिनंदन केले. तसेच ऑनलाइन संवाद ही साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मला तिथे समक्ष येण्यास जमणार नाही. यासाठी या नवीन पध्दतीने तुमच्याशी संवाद साधत आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले (Aditya Thackeray appreciated the beautiful village).

मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे सरकारी बंगल्याबाहेर; पीडब्ल्यूडीच्या कारभाराचा नमुना

IAS प्राजक्ता लवंगारे यांची बदली, उद्धव ठाकरे यांनी दिले मानाचे पद

कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, ओझोन जनजागृती असे अनेक उपक्रम राबवले. पिंपळगाव ग्रामपंचायतीने सहा-सात महिन्यांत काम केले. याच कामाची पावती म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

Aditya Thackeray appreciated the beautiful village
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पिंपळगावाच्या कामाचा आढावा घेतला. ग्रामसेवक लिंगराज जंगम व सरपंच अलका बनकर, यांना पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या ऑनलाइन भेटीमध्ये विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, अभिनेते अमिर खान, पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकल उपस्थित होते.

जिम कॉर्बेट येथील ढिकाला झोन मधली रोमांचकारी टायगर सफारी

MLA Pratap Sarnaik’s letter to Uddh .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83734393.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

माझी वसुंधरा अभियानातील विभाग स्तरावरील पुरस्कार विजेते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह पुणे, सातारा, अहमदनगर, जळगाव, नाशिकचे जिल्हाधिकारी, व जळगाव, अहमदनगर, नाशिक येथील जिल्हा परिषदांचे सीईओ, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त, मुख्याधिकारी व ग्रामसेवक हेही सहभागी झाले होते (Aditya Thackeray appreciated the beautiful village).

त्यानंतर ठाकरे यांनी स्थानिक संस्थांनी माझी वसुंधरा अंतर्गत केलेल्या कामांची माहिती घेतली. आमीर खान यांनी माझी वसुंधरा अभियानातून हाती घेण्यात आला. या विविध उपक्रमांचे कौतुक केले (Aditya Thackeray appreciated the beautiful village).

या अभियानाच्या माध्यमातून अत्यंत मुलभूत प्रश्नांवर काम करण्यात येत आहे. वातावरणीय बदलासंदर्भात चित्रपटांद्वारे बनवून त्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करता येईल. यासंदर्भात विचार करू, असे अमीर खानने सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी