33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजBIG BREAKING : ‘काँग्रेस’च्या मंत्र्यांना ‘कोरोना’

BIG BREAKING : ‘काँग्रेस’च्या मंत्र्यांना ‘कोरोना’

टीम लय भारी

मुंबई / नांदेड : ‘कोरोना’चा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यापूर्वी एका मंत्र्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या एका मंत्र्यांना ‘कोरोना’ची ( BIG BREAKING ) लागण झाली आहे.

हे मंत्री दहा बारा दिवस मुंबईत होते. मुंबईवरून ते चार दिवसांपूर्वी आपल्या मतदारसंघात गेले. ‘रेड झोन’मधून आल्यामुळे मंत्र्यांनी स्वतःला कॉरन्टाईन करून घेतले.

Mahavikas Aghadi

या मंत्र्यांच्या दोन वैद्यकीय चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. परंतु आज सकाळी पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल सायंकाळी उशिरा आला. त्यात ते ‘कोरोना पॉझिटव्ह’ ( BIG BREAKING ) असल्याचे आढळून आले आहे.

मंत्र्यांना कोरोना झाला असला तरी त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यांची तब्येत ठणठणीत आहे. त्यामुळे ते लवकरच या आजारातून बरे होतील, अशी अपेक्षा सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

मंत्रालयातील दोन आयएएस अधिकाऱ्यांसह 7 जणांना ‘कोरोना’ झाल्याचे यापू्रवीच उघड झाले आहे. आता दुसऱ्या मंत्र्यांनाही ‘कोरोना’ची लागण झाल्याने मंत्रालयात अधिक चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, या मंत्र्यांच्या संपर्कात अन्य मंत्री, अधिकारी ( BIG BREAKING ) आल्याच्या शक्यतेने खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

माजी IAS अधिकाऱ्याने आईच्या पुण्यतिथीच्या खर्चाची रक्कम दिली CM फंडाला

Fake News : जितेंद्र आव्हाडांच्या मुलीबाबत अपप्रचार, इंग्रजी वृत्तवाहिनीच्या दोन पत्रकारांवर कारवाई

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी