क्रिकेट

शिखर धवनच्या नेतृत्त्वात होणार ‘वन-डे’चा महासंग्राम

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली आहे. या विजयानंतर टीम इंडियाचे पुढचे लक्ष्य वनडे  मालिका आहे, ज्याची कमान आता भारताच्या अनुभवी खेळाडू शिखर धवन याच्याकडे आहे. पुढील वर्षी होणाऱ्या  विश्वचषकापूर्वी आता होणारा प्रत्येक सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा असेल कारण यावेळी विश्वचषकाची होस्टिंग भारताकडे आहे, आणि त्यामुळे टीम इंडियाला ट्रॉफी जिंकण्याची ही सर्वोत्तम संधी असणार आहे.

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या वेळी वनडे संघाची कमान ही शिखर धवनकडे आहे. या वनडे सामन्यात शिखर धवन कर्णधार तर ऋषभ पंत उपकर्णधार पदी पाहायला मिळेतील.

वनडे सामन्यांचे वेळापत्रक
वनडे सामन्या बद्दल बोलायचे झाले तर हा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये होणार आहे. या तीन दिवसीय वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल तर दुसरा सामना 27 नोव्हेंबर रोजी आणि तिसरा आणि शेवटचा सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. हे सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतील.
या वेळी हार्दिक पांड्या संघाचा भाग नाही
या वनडे मालिकेत हार्दिक पांड्या संघाचा भाग असणार नाही. संघाची कमान शिखर धवनकडे तर उपकर्णधार ऋषभ पंतकडे आहे. आयपीएल 2022 मध्ये राजस्थानकडून खेळताना शानदार गोलंदाजी करणऱ्या वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला या वनडे मालिकेत संधी मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा.. प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

Virat Kohli : ‘विराट की बाबर कोणाची कव्हर ड्राईव्ह भारीये?’ किवी कर्णधार केन विल्यमसनचे दिलखुलास उत्तर

PHOTO: तरुणांनो सांधेदुखीच्या त्रासाने त्रस्त झालायं; मग योगासनांचे हे प्रकार कराच!

भारताीय वनडे संघाचे खेळाडू –
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप यादव सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

न्यूझीलंड वनडे संघाचे खेळाडू –
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, टॉम लॅथम (विकेटकीपर), मॅट हेन्री.
T20 प्रमाणे वनडे देखील ऍमेझॉन (Amazon) प्राइमवर
T20 सामण्या प्रमाणेच वनडेची ही मालिका देखील व्हिडिओ प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर येईल, त्याचबरोबर डीडी फ्री डिशच्या डीडी स्पोर्ट्स चॅनलवर सुद्धा ही वनडे मालिका दिसणार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

33 mins ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

15 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

16 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

17 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

18 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

18 hours ago