28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाVirat Kohli : 'विराट की बाबर कोणाची कव्हर ड्राईव्ह भारीये?' किवी कर्णधार...

Virat Kohli : ‘विराट की बाबर कोणाची कव्हर ड्राईव्ह भारीये?’ किवी कर्णधार केन विल्यमसनचे दिलखुलास उत्तर

दोघांच्या कव्हर ड्राईव्हवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला प्रश्न विचारण्यात आला. यावर केन विल्यमसनने दिलखुलासपणे आपले मत व्यक्त केले आणि विनासंकोच थेट भारताचा माजी कर्मधार विराट कोहलीचे नाव घेतले.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्याबाबत अनेकदा चर्चा होते. अनेकदा लोक दोघांची तुलना करतात. मात्र, दोघांची तुलना करण्यात अर्थ नाही कारण दोघेही वेगवेगळ्या काळातील खेळाडू आहेत. एकीकडे विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर बाबर आझमने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. दोन्ही खेळाडू उत्तम कव्हर ड्राइव्ह खेळतात. आता या दोघांच्या कव्हर ड्राईव्हवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला प्रश्न विचारण्यात आला. यावर केन विल्यमसनने दिलखुलासपणे आपले मत व्यक्त केले आणि विनासंकोच थेट भारताचा माजी कर्मधार विराट कोहलीचे नाव घेतले.

विल्यमसनने मजेशीर उत्तर दिले
दोघांच्या कव्हर ड्राईव्हबद्दल अनेकदा वाद होतात. दोघेही त्यांच्या खेळातील निष्णात खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या कव्हर ड्राईव्हबद्दल विल्यमसनला विचारण्यात आले तेव्हा त्याने अतिशय मजेशीर उत्तर दिले. ESPNcricinfo वर बोलताना विल्यमसनने या प्रश्नाला उत्तर दिले की, “कोहलीचा कव्हर ड्राईव्ह.” हे उत्तर देण्यापूर्वी विल्यमसनने संकोच केला, पण शेवटी त्याने कोहलीचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्तम असल्याचे वर्णन केले.

हे सुद्धा वाचा

Tushar Gandhi : ‘गांधी हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला मदत केली’ तुषार गांधींचा खळबळजनक दावा

Shraddha Murder Case : ‘जे झालं ते चुकून झालं!’ श्रद्धा हत्याकाडांचा आरोपी आफताबची न्यायालयासमोर कबूली

Kokan Festival : मुलुंडमध्ये बुधवारपासून अस्सल कोकणी संस्कृतीचा ‘कोकण महोत्सव’

टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर आहे
भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या फेरीत दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यामध्ये दोन टी-20 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 65 धावांनी विजय मिळवला होता. मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

त्याच वेळी, 25 नोव्हेंबर, शुक्रवारपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल. यामध्ये मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथील ईडन पार्क येथे होणार आहे. याशिवाय दुसरा सामना रविवार 27 नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे तर तिसरा सामना 30 नोव्हेंबर रोजी हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल. विशेष म्हणजे भारतीय संघाचे टी-20 कर्णधार हार्दिक पांड्याकडे आहे. त्याचबरोबर वनडेची कमान शिखर धवनच्या हाती असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी