29 C
Mumbai
Monday, January 29, 2024
Homeमहाराष्ट्रविक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा.. प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

विक्रम गोखले यांच्या निधनाच्या अफवा.. प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे चुकीचे वृत्त माध्यमांमधून परसवले जात आहे. गुरूवारी (दि. 24) रोजी सकाळी 10 वाजता गोखले यांच्या कुटुंबियांची आणि डॉक्टरांची बैठक झाली अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे चुकीचे वृत्त माध्यमांमधून परसवले जात आहे. गुरूवारी (दि. 24) रोजी सकाळी 10 वाजता गोखले यांच्या कुटुंबियांची आणि डॉक्टरांची बैठक झाली अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.

बुधवारी रात्री पासून सोशल मीडियावर विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे चुकीचे वृत्त पसरवले गेले. अनेकांनी गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक माध्यमांनी देखील बुधवारी रात्री त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. या पार्श्वभूमीवर गोखले कुटुंबियांचे जवळचे मित्र राजेश दामले यांनी माध्यमांशी संवाद साधत विक्रम गोखले यांची प्रक्रती चिंताजनक असल्याचे सांगितले. गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. गोखले म्हणाले, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जो पर्यंत डॉक्टर सांगत नाहीत आम्ही देखील काही सांगू शकत नाही. तर गोखेले यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवले असून डॉक्टर त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान विक्रम गोखले यांच्या मुलीने देखील माध्यमांना गोखले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवल्या जावू नयेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा असे देखील आवाहन गोखले यांच्या मुलीने केले आहे.

हे सुद्धा वाचा :

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण…

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा : बाळासाहेब थोरात यांचे ‘परफेक्ट मॅनेजमेंट’

Maharashtra: ‘टेड टॉक’, ‘जोश टॉक्स’ नंतर आता टिचर्स टॉक्स; ग्रामीण भागातील शिक्षकांचा प्रेरणादायी ट्रेंड येणार!

गोखले कुटुंबाचे तीन पिढ्यांपासून चित्रपटसृष्टीशी नाते
विक्रम गोखले यांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी खूप जूने नाते आहे. त्यांची पणजी हिंदी चित्रपटातील पहिली नाईका होती. त्यांच्या आजीने देखील बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम केले होते, या चित्रपटाचे दिग्दर्शन दादासाहेब फाळके यांनी केले होते. तर गोखले यांचे वडील देखील चित्रपट सृष्टीत होते, त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. विक्रम गोखले यांनी देखील हिंदी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच मालिका, नाटकांमध्ये देखील अनेक कसदार भूमिका त्यांनी केल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या मराठी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका केली होती. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अभिनय केला आहे. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या परवाना या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी