क्राईम

‘टेंडर मागे घे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’; दहिवडी पोलिसांत एकावर गुन्हा दाखल

कामाचे टेंडर ऑनलाइन का भरलेस? असे म्हणत ऑनलाइन टेंडर भरल्याचा राग मनात धरून टेंडर मागे घे, नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर दहिवडी (ता. माण, जि.सातारा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विजय कुदळे यांनी किसन सस्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. किसन सस्ते हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याचे देखील समजते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामाचे टेंडर ऑनलाइन का भरलेस? असे म्हणत ऑनलाइन टेंडर भरल्याचा राग मनात धरून टेंडर मागे घे, नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही, असे म्हणत ठेकेदार विजय कुदळे यांना फलटण चौकात दमदाटी व शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.
हे सुद्धा वाचा
मुंबई महापालिकेच्या कँटीनमधून 7 हजार चमच्यांची चोरी
सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये तुंबळ धुमश्चक्री
बाबासाहेबांना लडाखमध्ये आदरांजली

याचसोबत तक्रारदार यांना टेंडर मागे घेण्याबाबत एक महिन्यापासून दमदाटी केली जात असून कोणतीही विचारपूस न करता मारहाण केली आहे. त्यामुळे मारहाण केलेप्रकरणी किसन सस्ते यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

22 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago