30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईमुंबई महापालिकेच्या कँटीनमधून 7 हजार चमच्यांची चोरी

मुंबई महापालिकेच्या कँटीनमधून 7 हजार चमच्यांची चोरी

मुंबई महानगर पालिकेच्या कँटीन मध्ये अजब प्रकार घडला आहे. कँटीन मधून 7 हजार चमचे गायब झाले आहेत. प्लेट आणि इतरही हजारो वस्तू गायब झाल्या आहे. या वस्तू जेवायला येणाऱ्या ग्राहकांना दिल्या जातात मात्र, त्यानंतर अनेक वस्तू गायब होतात.

मुंबई महानगर पालिकेच मुख्यालय बोरीबदर येथे आहे. या मुख्यालयात पहिल्या मजल्यावर स्टाफ कँटीन आहे. मुख्यालयात हजारो कर्मचारी काम करतात. त्यांच्यासाठी ही कँटीन आहे. पण या कँटीनचा पोलीस, मुख्यालयात कामानिमित्त येणारे हजारो लोक लाभ घेत असतात. जेवण स्वस्त आणि चांगलं असल्याने इथे ग्राहकांची गर्दी असते. रोज हजारो लोक इथे नास्ता आणि जेवण करत असतात.

ही कँटीन सिद्धिविनायक कटर्स चालवत आहे. यांनी कॅन्टीनच्या आत काटे, प्लेट चम्मच बाबत एक बोर्ड लावून इथे येणाऱ्या ना आवाहन केलं आहे की कृपया आपण चमचे, काटे, जेवणाच्या प्लेट आणि नाश्त्याच्या प्लेट बाहेर घेऊन जाऊ नका, अस आवाहन केलं आहे.

कँटीन मधून गेल्या वर्षभरात चोरी झालेले साहित्य 

चमचे 6000 ते 7000

लंच प्लेट 150 ते 200
नास्ता प्लेट 300 ते 400 आणि
ग्लास 100 ते 150 गायब झाले आहेत.

कँटीन मधील प्लेट, चमचे कामगार, अधिकारी बाहेर घेऊन जातात. त्यामुळे कँटीन कर्मचारी यांची अडचण होत, असल्याचं बोर्डवर लिहल आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. महानगरपालिकेत प्लेट, चमचे कसे गायब होतात याचीच चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये तुंबळ धुमश्चक्री 

बाबासाहेबांना लडाखमध्ये आदरांजली 

अमित शाह मुंबईत; अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी