30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeजागतिकसुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये तुंबळ धुमश्चक्री

सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये तुंबळ धुमश्चक्री

सुदानमध्ये लष्करी जवान आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली असून दोन्ही गटात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान भारतीय दुतावासाने तेथील भारतीयांना सावध राहण्याचे आवाहन करत घराबाहेर पडू नका असा सल्ला देखील दिला आहे.

सुदान देशाची राजधानी असलेल्या खार्तुम येथे लष्करी आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. सुदानच्या निमलष्करी दलाच्या नेत्याने लष्करी दलाच्या सर्वच तळांवर ताबा मिळवेपर्यंत हा लढा सुरु ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.

खार्तुम येथील भारतीय दुतावासाने म्हटले आहे की, आम्ही खार्तुम आणि ओमरदुरमनन येथील जवळपास २५०० ते ३००० भारतीयांसाठी व्हाट्सअप ग्रुप बनविला असून या ग्रुपमधून वेळोवेळी सर्व परिस्थितीची माहिती भारतीय नागरिकांना दिली जात आहे. तसेच भारतीय नागरिकांसाठी एक हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आला आहे. या हेल्पलाईन नंबरवर भारतीय नागरिक फोन करुन माहिती विचारु शकतात. गेल्या आठवड्यापासून सुदानमधील परिस्थिती चिघळली असून आज लष्करी दल आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये गोळीबाराच्या घटना झाल्या आहेत.


हे सुद्धा वाचा
बाबासाहेबांना लडाखमध्ये आदरांजली

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी जखमींची घेतली भेट

मुंबईत दहशतवादी घुसल्याची खोटी माहिती देणारा अहमदनगरचा; एटीएसने आवळल्या मुसक्या

दरम्यान सुदानच्या वायू सेनेने निमलष्करी दलाविरोधात कारवाईची मोहीम सुरु केली आहे. वायु दलाची लढावू विमाने राजधानी खार्तुमवर घिरट्या घालत असल्याचे देखील प्रसारमाध्यमांनी वाहिन्यांवर दाखविले आहे.

काही दिवसांपूर्वी सुदानच्या लष्करी जवानांमध्ये आणि निमलष्करी दलाच्या जवानांमध्ये असाच तणाव पहायला मिळाला होता. दरम्यान निमलष्करी दलाच्या जवानांनी विमानतळावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी