क्राईम

पत्रकारास अपमानास्पद वागणूक दिल्या संदर्भात पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

लाल दिवा : पत्रकार भाई सोनार यांना अपमानास्पद वागणूक दिल्या संदर्भात पत्रकारांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. यावेळी पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना सदर घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. या संदर्भात पत्रकारांनी पोलीस आयुक्तांच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले आहे.पत्रकार भाई सोनार यांना गेल्या दोन दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती. या संदर्भात मंगळवारी सायंकाळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्याला योग्य ती समज देण्यात येईल असे सांगितले. यावर पत्रकारांनी समाधान मानले.(In the context of journalist being treated with disrespect
Police commissioner orders probe )

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत इमारतीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून एका कामगाराचा हकनाक मृत्यू झाल्याच्या घटने संदर्भात माहिती घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी भाई सोनार हे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याकडे गेले. तसेच पोलीस निरीक्षकाकडे जाण्यापूर्वी ठाणे अंमलदार तसेच संबंधित तपासी अंमलदाराकडे या घटनेची माहिती विचारली असता त्यांनी टाळाटाळ केली. तसेच संबंधित प्रकरणाबाबत वरिष्ठ निरीक्षकांना जाऊन विचारा असे सांगितले. यावेळी माध्यम प्रतिनिधी पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये पाय ठेवताच ही काय धर्मशाळा आहे का ? गेट आउट ! कोणीही येतं कोणीही जात ! अस म्हणत या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करीत माध्यम प्रतिनिधींचा अपमान केला. पोलीस निरीक्षकाला एवढा राग येण्याचे कारण काय ? याचा अर्थ या प्रकरणात दाल मे कुछ काला है ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर बाब पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर पडताच पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. सदर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता निर्माण करून कारवाईची मागणी केली आहे. तर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश रूपवते, प्रमोद दंडगव्हाळ, भाई सोनार, निशिकांत पाटील, दिनेश जाधव, किरण आहेर, सागर चौधरी, भगवान थोरात आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, सध्या आचारसंहिता असल्यामुळे बदलीचा विषय किचकट आहे. परंतु याबाबत योग्य ती चौकशी करण्याचे आदेश त्यांनी उपस्थित असलेल्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना दिले.

टीम लय भारी

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

10 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

10 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

10 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

10 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

10 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

14 hours ago