एज्युकेशन

ISRO देणार तुमच्या मुलांना मोफत शिक्षणाची संधी; आजच अर्ज करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहे. इयत्ता आठवीपर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स शिकण्याची इच्छा आहे आणि विज्ञान आणि गणिताची मूलभूत माहिती आहे, असे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. इस्रोच्या स्पेस क्युरिओसिटी (स्पेस क्युरिओसिटी) चा उपक्रमाचा एक भाग म्हणून हा अभ्यासक्रम दिला जातो. त्याचप्रमाणे NCERT च्या अभ्यासक्रमानुसार रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. इस्रोच्या विविध केंद्रातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक हे वर्ग घेणार आहेत. (ISRO Antriksh Jigyasa)

शालेय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्याख्यानांच्या माध्यमातून रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि पृथ्वी आणि त्याच्या पर्यावरणाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर याची माहिती देणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दीष्ट आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सहज अवगत होईल अशी सोपी भाषा चित्र आणि ॲनिमेशनचा वापर या अभ्यासक्रमात केला जाणार आहे. यात रिमोट सेन्सिंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (ईएमआर), जिओस्टेशनरी आणि सूर्य-समकालिक उपग्रह, रिमोट सेन्सरचे प्रकार आणि मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर या सारख्या विषयांचा समावेश असेल.

इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी jigyasa.iirs.gov.in/login या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. त्याचप्रमाणे तिथे तुम्हाला विचारलेली काही महत्वाचे तपशीले भरायची आहेत. विद्यार्थ्यांना वैयक्तिक माहितीबरोबरच शाळेचा तपशीलही विचारले जातील. तुमची निवड झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू होण्याची तारीख आणि अभ्यासक्रम तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येईल.

हे सुद्धा वाचा : ‘स्किल इंडिया’ अंतर्गत देशातील तरुणांना प्रशिक्षणाची संधी

देशविदेशातील विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्यासाठी आले पाहिजेत : राज्यपाल कोश्यारी

काय म्हणता ! जिल्हा परिषदेच्या शाळेत फक्त एकच विद्यार्थी…

Team Lay Bhari

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

14 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

14 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

15 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

15 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

17 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

18 hours ago