33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराष्ट्रीय'स्किल इंडिया' अंतर्गत देशातील तरुणांना प्रशिक्षणाची संधी

‘स्किल इंडिया’ अंतर्गत देशातील तरुणांना प्रशिक्षणाची संधी

स्किल इंडिया अभियानांतर्गत (Skill India Mission) भारतातील तरुणांसाठी करिअरच्या संधींना चालना देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने 9 जानेवारी 2023 रोजी देशभरातील 242 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटीशीप मेळाव्याचे Pradhan (Mantri National Apprenticeship Mela) आयोजन केले आहे. (Skill India under Apprenticeship opportunity for youth)

विविध क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी प्रशिक्षणाव्दारे स्थानिक तरुणांना संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशातील स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना (local businesses and organizations) या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन देखील कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने केले आहे.

या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील अनेक कंपन्या देखील सहभागी होणार आहेत. तसेच सहभागी संस्थांना एकाच व्यासपीठावर संभाव्य प्रशिक्षणार्थी तरुणांना भेटण्याची तसेच अर्जदारांची निवड करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे प्रशिक्षणार्थींना नोकरीची आणि नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटीशीप मेळाव्याचे आपल्या जिल्ह्यातील जवळचे ठिकाण शोधण्यासाठी तसेच मेळाव्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन देखील संबंधित मंत्रालयाने केले आहे.

हे सुद्धा वाचा 

माझ्या नादाला लागू नका, राजवस्त्रे बाजूला काढा मग दाखवतो; संजय राऊत यांचे राणेंना आव्हान

योगींनी उत्तरप्रदेशसाठी मुंबईतून ५ लाख कोटी नेले!

उर्फी सोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झालाय का…; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल 

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव, अतुल कुमार तिवारी म्हणाले की, प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटीशीप मेळावा हे एक असे व्यासपीठ आहे, जेथे शिकाऊ उमेदवार आणि संबंधीत कपन्यांची भेट घडवते आणि इच्छुकांना कंपन्यांना प्रत्यक्ष संवाद साधण्याची आणि त्यांना ज्या उद्योगात प्रशिक्षण आणि करिअर करायचे आहे त्याविषयी जाणून घेण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येते. देशात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शिकाऊ उमेदवारी मेळावा आयोजित केला जातो, ज्यामध्ये निवडक व्यक्तींना नवीन कौशल्ये प्राप्त करण्यासाठी सरकारी निकषांनुसार मासिक विद्यावेतन मिळते.

अतुल कुमार तिवारी म्हणाले, सरकार दर वर्षी 1 लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी, उद्योग संस्था आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रधानमंत्री नॅशनल अप्रेंटीशीप मेळाव्याचा एक व्यासपीठ म्हणून वापर केला जात आहे. तसेच सहभागी कंपन्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध संधींबद्दल तरुणांना जागरूकता देखील प्रदान करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी