एज्युकेशन

Job Updates : ‘नॅशनल इंस्टिट्यूट’मध्ये मेगा भरती, पगार ऐकाल तर अचंबित व्हाल

अनेकजण बऱ्याचदा वेगवेगळ्या नोकरीच्या शोधात दिसतात, परंतु दरवेळी यश मिळतेच असे नाही. नोकरी मिळते मात्र त्याला साजेसा पगार न मिळाल्याने अनेकांची नाराजी होते त्यामुळे सुद्धा अनेकजण निराशेच्या गर्तेत सापडल्याचे पाहायला मिळतात, तरीसुद्धा नोकरी शोधण्याचे काम सुरूच असते. जे कोणी चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर येथे शास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर  अशा विविध पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे, ज्याला चांगला पगार सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे इच्छुकांनी या संधीचा लाभ नक्कीच घ्यायला हवा.

हाती आलेल्या माहितीनुसार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोएमेटोलॉजी, चंद्रपूर (National Institute Of Immunohematology Chandrapur) येथे विविध पदांसाठी लवकरच भरती करण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार असून यामध्ये शास्त्रज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर अशा अनेक पदांवर काम करण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे.

या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी https://niih.org.in/projectappli/  या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2022 आहे त्यामुळे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी या तारखेपर्यंत अर्ज करायचे आहेत. यासाठी काही कागजपत्रांची आवश्यकता लागणार आहे त्यांची यादी सुद्धा देण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा…

Mumbai News : मुंबई विद्यापीठात दारुच्या बाटल्यांचा खच, शिंदे गटाकडून विद्यापीठाला आहेर

Mukesh Ambani : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या व्यक्तिला बिहारमधून अटक

Dasra Melava 2022 : ठाकरेंचे भाषण प्रतिक्रिया देण्यायोग्य नाही, फडणवीसांकडून टीका

Resume (बायोडेटा), दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स),पासपोर्ट साईझ फोटो अशा कागदपत्रांची यावेळी गरज भासणार आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने सदर कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी उमेदवारांनी MBBS /BAMS /BHMS पर्यंत शिक्षण घेतलेले असणं गरजेचे आहे, शिवाय किमान यामध्ये चार वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदासाठी अर्ज करणार असाल तर उमेदवारांनी M.A. in Sociology/MSW पर्यंत शिक्षण पुर्ण केलेले असणे गरजेचे आहे. शिवाय यामध्ये दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) या पदासाठी उमेदवारांनी Diploma Nursing OR Midwifery (GNM) पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे, शिवाय किमान अनुभव असणं सुद्धा गरजेचे आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) या पदासाठी सुद्धा उमेदवारांनी बारावी आणि MS ऑफिस पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे आणि यामध्ये सुद्धा उमेदवाराला किमान अनुभव असणे गरजेचे आहे.

या पदांसाठी देण्यात येणाऱ्या पगाराबाबत सुद्धा माहिती देण्यात येणार आहे. शास्त्रज्ञ या पदासाठी 64,000 रुपये प्रतिमहिना + 2775/- HRA असे देण्यात येणार आहे, तर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता या पदासाछी 32,000 रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे. स्टाफ नर्ससाठी 31,500 रुपये प्रतिमहिना पगार देण्यात येणार आहे. डेटा एंट्री ऑपरेटर 18,000 रुपये प्रतिमहिना मिळणार आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

22 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago