30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयDasra Melava 2022 : ठाकरेंचे भाषण प्रतिक्रिया देण्यायोग्य नाही, फडणवीसांकडून टीका

Dasra Melava 2022 : ठाकरेंचे भाषण प्रतिक्रिया देण्यायोग्य नाही, फडणवीसांकडून टीका

सकाळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या भाषणावरून टोलेबाजी केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या भाषणावर व्यक्त होत ठाकरेंचे भाषण प्रतिक्रिया देण्यायोग्य नाही असे म्हणून बोलणे टाळले.

यंदाचा दसरा मेळावा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरत असून त्याबाबत केवळ जनसामान्यांमधूनच नाही तर राजकीय वर्तुळात सुद्दा चर्चा होत आहे. प्रचंड जनसागराच्या उपस्थित काल दसरा मेळावा पार पडला असला तरीही आज सुद्धा त्यावर चर्चेचा सूर कायम असल्याचा दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांना सुद्दा या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकमेकांवर तुटून पडण्याची नामी संधी चालून आल्यामुळे आज दोन्ही गटाकडून यच्छेद तोंडसूख घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या भाषणावरून टोलेबाजी केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या भाषणावर व्यक्त होत ठाकरेंचे भाषण प्रतिक्रिया देण्यायोग्य नाही असे म्हणून बोलणेच टाळले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी कालच्या दसरा मेळाव्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे निव्वळ शिमगा होता, त्यापलीकडे या भाषणात काहीच नव्हते. मी अशा शिमग्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नसतो. मी काल नागपूरात धम्मचक्र परिवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. त्यामुळे मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणाचेही भाषण ऐकले नाही. नंतर दोन्ही भाषणांचा सारांश माझ्यापर्यंत पोहोचला. तसेच यूट्युबर मी एकनाथ शिंदे यांचे थोडेफार भाषण पाहिले, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर बोलण्यात अर्थ नसल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा…

PM Jan Dhan Yojana : आता तुम्हाला विना इंटरनेट कळेल तुमच्या जनधन खात्यातील बॅलेंस! जाणून घ्या एका क्लिकवर

Corona Updates : गेल्या 24 तासांत आढळले कोरोनाचे नवे 5 हजार रुग्ण; परिस्थिती चिंताजनक

Ajit Pawar : दसरा मेळाव्यात भाषणे कुणाची लांबली हे तुम्हाला माहितीये, अजित पवारांचा मिश्किल टोला

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यादरम्यान केलेले भाषण स्क्रीप्टेड असल्याच्या वावड्या उठत असल्यामुळे माध्यमांनी थेट देवेंद्र फडणवीसांनाच याबाबत  विचारले. यावेळी फडणवीस म्हणाले, जे असं म्हणतात, त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तुमच्या स्क्रिप्ट रायटरला जराशी सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) दाखवायला सांगा. नाहीतर तुमचा स्क्रिप्ट रायटर बदलून टाका. आता आम्हालापण तेच तेच ऐकून कंटाळा आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर होत असलेल्या आरोपांचे खंडण केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर बोलण्यास देवेंद्र फडणवीस यांनी थेट नकार दिला असला तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे, त्यांच्या भाषणाचे कौतुक केले आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांनी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले. काल ज्या प्रमाणात बीकेसी मैदानावर लोकं पाहायला मिळत होती, त्यावरुन हे सिद्ध होते. बीकेसी मैदानाची क्षमता शिवाजी पार्कच्या दुप्पट आहे. तरीदेखील बीकेसी मैदान तुडुंब भरले होते. या दसरा मेळाव्यासाठी मुंबई आणि महानगर क्षेत्र तसेच राज्यभरातून लोकं आली होती. या शिवसैनिकांनी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले, असे म्हणून त्यांनी शिंदे यांचे भरभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी