29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रMukesh Ambani : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या व्यक्तिला बिहारमधून अटक

Mukesh Ambani : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या व्यक्तिला बिहारमधून अटक

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत मुंबई पोलिसांचे पथक परतत आहे.

बुधवारी (5 ऑक्टोबर) भारतातील यशस्वी उद्योजक आणि रिलायन्स कंपनीचे मालक असणाऱ्या मुकेश अंबानी यांना धमकीचा फोन आला होता. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता याप्रकरणात सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत मुंबई पोलिसांचे पथक परतत आहे. बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाइनवर कॉल करून हॉस्पिटलमध्ये बॉम्ब टाकण्याची आणि अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. यावेली बिहारमधील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे.

डीसीपी नीलोत्पल म्हणाले की, “अंबानी कुटुंबाला धमक्या मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि आरोपीला मध्यरात्रीच्या सुमारास दरभंगा येथून अटक करण्यात आली. तसेच मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया उडवून देण्याची धमकी दिली. याआधीही मुकेश अंबानींच्या घराबाहेर जिलेटिन रॉड सापडले आहेत, त्यामुळे हा भाग संवेदनशील भागात येतो.” गेल्या दोन महिन्यांत या रुग्णालयाला दोन वेळा धमकीचे फोन आले आहेत. असाच कॉल ऑगस्टमध्ये आला होता जेव्हा विष्णू विधू भौमिक नावाच्या 56 वर्षीय सोनारला अटक करण्यात आली होती. आरोपीने स्वत:ला अफजल गुरू म्हणवून घेत पुढील तीन तासांत स्फोट घडवून आणणार असल्याचे सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

Dasra Melava 2022 : ठाकरेंचे भाषण प्रतिक्रिया देण्यायोग्य नाही, फडणवीसांकडून टीका

PM Jan Dhan Yojana : आता तुम्हाला विना इंटरनेट कळेल तुमच्या जनधन खात्यातील बॅलेंस! जाणून घ्या एका क्लिकवर

Corona Updates : गेल्या 24 तासांत आढळले कोरोनाचे नवे 5 हजार रुग्ण; परिस्थिती चिंताजनक

यावेळी अटक केलेल्या व्यक्ती राकेश मिश्राकडून तोच फोन जप्त करण्यात आला, ज्यावरून मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी आरोपीला बिहारमधून अटक केली असून, त्याला आता चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. ही घटना कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणली आणि त्यामागे त्याचा हेतू काय होता यचासर्व गोष्टींचा सध्या तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अलीकडेच सरकारने मुकेश अंबानींच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय त्यांची पत्नी नीता अंबानी यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. बुधवारी धमक्या मिळाल्यानंतर अँटिलियाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये फोन आल्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. तोपर्यंत रुग्णालयातील कर्मचारी फोनवर बोलत राहिले आणि पोलिसांना लोकेशनची माहिती मिळाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी