एज्युकेशन

वडिलांची चहाची टपरी, आई विडीकामगार पोरानं पांग फेडलं; मंगेश खिलारीचे युपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश

घरची परिस्थिती अत्यंत बेताची उदरनिर्वाहासाठी वडील चहाची टपरी चालवत, तर संसाराला हातभार म्हणून आई विड्या वळाचे काम करायची. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील पाराजी खिलारी आणि संगिता खिलारी या दाम्पत्याने अत्यंत प्रतिकुल परिस्थित मुलगा मंगेश खिलारी याला शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले. दिवसरात्र काबाडकष्ट करुन त्याच्या स्वप्नांना बळ दिले. मंगेशने देखील आई-वडिलांच्या कष्टाचे पांग फेडत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC च्या 2022 सालच्या परीक्षेत उज्जवल यश मिळवत देशात 396 वी रँक पटकावली आहे.

मंगशेचे सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण त्याच्याच सुकेवाडी गावात झाले, त्यानंतर माध्यमिक शिक्षण, शुक्लेश्वर महाविद्यालय, आणि पदवीचे शिक्षण श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यानंतर मात्र मंगेशने आभाळ पंखांखाली घेण्यासाठी पुण्याची वाट धरली. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्याने राज्यशास्त्रातून पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतले. याच काळात पुण्यात त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. गेली तीन वर्षे दिवसरात्र अभ्यास करुन युपीएससीच्या परीक्षेत मंगेशने 396 वी रॅँक मिळवत यश मिळवले आहे.

हे सुद्धा वाचा

UPSC परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली

UPSC परीक्षेत इशिता किशोर देशात पहिली; पहिल्या चार क्रमांकावर मुलींची बाजी

आयटी इंजिनियर तरुणी आई-भावासह बेंगळुरू दर्शन सहलीला निघाली अन् जीवच गमावून बसली !

मंगशे युपीएससी परीक्षा पास झाल्याचे समजतात त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा लागल्या. त्याच्या आई वडिलांना त्याने मिळवलेले यश पाहून शब्द फुटत नव्हते. आपल्या मुलाने गावाचे, तालुक्याचे नाव मोठे केले असे त्याचे वडील म्हणाले. मंगेशने कधीही आर्थक बोजा पडू दिला नाही ,असे देखील त्याचे वडील म्हणाले. तर गरीबीतून मुलाला शिक्षण दिले, त्याने कष्टाचे चीज करुन दाखवले अशी प्रतिक्रीया मंगेशच्या आईने माध्यमांना दिली.

 

प्रदीप माळी

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

11 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

11 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

12 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

13 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

13 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

13 hours ago