31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeएज्युकेशनUPSC परीक्षेत इशिता किशोर देशात पहिली; पहिल्या चार क्रमांकावर मुलींची बाजी

UPSC परीक्षेत इशिता किशोर देशात पहिली; पहिल्या चार क्रमांकावर मुलींची बाजी

देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सन 2022 च्या UPSC परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत पहील्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली असून इशिता किशोरी ही देशात पहिली आल आहे. दुसऱ्या क्रमांकावर गरिमा लोहिया, तिसऱ्या स्थानावर उमा हरिथी एन या मुलींनी रॅंक पटकाली आहे. युपीएससी परीक्षेत 933 उमेदवार पात्र ठरले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) कडून घेण्यात आलेल्या सन 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत यंदा पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. या परीक्षेचा निकाल युपीएससीच्या www.upsc.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी अत्यंत कष्टाने विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुनपत्रिका त्यांना पंधरा दिवसांमध्ये मिळणार आहे.

युपीएससीच्या अंतिम निकालामध्ये 933 विद्यार्थी यंदा पात्र ठरले आहेत. यामध्ये 345 विद्यार्थी खुल्या गटातून, आर्थिक मागास प्रवर्ग म्हणजेच ईडब्ड्यूएसमधून 99, ओबीसी प्रवर्गातून 263, एससी प्रवर्गातून 154, अजा प्रवर्गातून 72 विद्यार्थ्यी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून IAS साठी 180 विद्यार्थ्यांची निवड युपीएससीने केली असून त्याची यादी देखील तयार केली आहे.

हे सुद्धा वाचा

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

Google तुमचे Gmail अकाऊंट, फोटोज डिलीट करेल; जर तुम्ही ‘हे’ केलेले नसेल तर …

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल इतिहासजमा होणार; मग रेल्वेप्रवासाची पर्यायी सोय काय?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी