मनोरंजन

हास्य जत्रा फेम दत्तू मोरेने बांधली लगीनगाठ

महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी मालिकेतून घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता दत्तू मोरे विवाह बंधनात अडकला आहे. त्याच्या प्रि वेडिंग शुटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तू आणि त्याच्या पत्नीचे फोटो पोस्ट केले आहेत. स्वाती घुनागे हिच्यासोबत दत्तू मोरेने आपली लगीनगाठ बांधली असून, अनेकांनी या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. हास्य जत्रामधील त्याचे सहकारी कलाकार शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगूर्लेकर यांनी दत्तूला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुळचा ठाणेकर असलेला दत्तू मोरे महाराष्ट्राची हास्य जत्रामधून घराघरामध्ये पोहचला. विनोदी अभिनेता म्हणून त्याची मराठी मनोरंजन क्षेत्रात ओळख निर्मान झाली आहे. दत्तू मोरे ज्या ठाण्यातील चाळीत मोठा झाला त्या चाळीला दत्तू मोरे चाळ असे नाव तेथील चाळकऱ्यांनी दिले आहे. दत्तू मोरे हा यशाचा शिखरावर पोहचला तरी त्याने आपल्या लोकांशी असलेली नाळ कायम राखली त्यामुळे त्याचे कौतुक देखील होते. हास्य जत्रेतून त्याने आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले. त्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

हे सुद्धा वाचा

UPSC परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली

आयटी इंजिनियर तरुणी आई-भावासह बेंगळुरू दर्शन सहलीला निघाली अन् जीवच गमावून बसली !

UPSC परीक्षेत इशिता किशोर देशात पहिली; पहिल्या चार क्रमांकावर मुलींची बाजी

दत्तूने लग्नबंधनात अडकल्यानंतर त्याचे त्याचे पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कोणताही बडेजाव न मिरवता दत्तूने गुपचुप लग्न उरकले. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेज वरुन दत्तूच्या प्रि वेडिंगचे फोटो पोस्ट केले असून त्यात ‘जस्ट मॅरिड’ असे कॅप्शन देखील दिले आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

4 hours ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

5 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

6 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

6 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

15 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

16 hours ago