एज्युकेशन

प्रतीक्षा संपली; उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे, उद्या (2 जून) रोजी SSC चा निकाल जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावी निकाल कधी लागणार याची पालक, विद्यार्थी वाट पाहत होते. 12 वीचा निकाल लागल्यानंतर लवकरच दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता उद्या निकाज जाहीर होणार असून सर्वांची प्रतिक्षा संपली आहे. विद्यार्थी, पालकांना उद्या ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतिने घेण्यात आलेल्या या परीक्षा तब्बल 533 केंद्रांवर पार पडल्या. दहावी एसससीची परीक्षा राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती आणि कोकण या नऊ विभागात पार पडल्या. उद्या या दहावीचे विभागनिहाय निकाल जाहीर होणार आहेत.

यंदा राज्यात जवळपास 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या एकुण वि्द्यार्थ्यांमध्ये 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 लाख 33 हजार 67 मुली आहेत. तसेच 8 हजार 189 विद्यार्थी दिव्यांग असून 73 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

वन विभागाने २० वर्ष अडवली वाडा-मनोर महामार्गाची वाट!

राज्यातील ‘या’ भागात भीषण जलसंकट, दुषित पाणी देतयं आजारांना आमंत्रण

सुंदर दिसण्यासाठी कोरफडीचा असा करा वापर; त्वचा होईल मुलायम, केस होतील काळेभोर

दहावीचा निकाल ऑनलाईन लागणार असून www.mahresult.nic.in , http://sscresult.mkcl.org , https://ssc.mahresults.org.in , www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकाल पाहता येणार आहे. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

कसा पाहाल ऑनलाईन निकाल

विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर भेट द्यायची आहे.
त्यानंतर दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक, जन्मतारीख, आईचे नाव अशी माहिती भरायची आहे.

त्यानंतर तुम्हाला दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

22 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago