मनोरंजन

मंत्रों से बढके तेरा नाम, जय श्री राम: रामनवमीनिमित्त ‘आदिपुरुष’च्या नव्या पोस्टरचे अनावरण

आज देशभरात राम नवमी उत्साहानं साजरी केली जात आहे. आज राम नवमीच्या दिवशी अभिनेता प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाचं नवं पोस्ट प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. दिग्दर्शक ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं हे नवं पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. ओम राऊतसोबतच क्रिती, प्रभास, देवदत्त आणि सनी सिंह यांनी देखील आदिपुरुष चित्रपटाचे हे नवे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरला त्यांनी कॅप्शन दिलं, ‘मंत्रों से बढके तेरा नाम, जय श्री राम’ आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी रिलीज होणार आहे.

ओम राऊतनं शेअर केलेल्या आदिपुरुष या चित्रपटाच्या पोस्टमध्ये प्रभास हा श्री रामाच्या भूमिकेत दिसत आहे तर क्रिती सेनन ही सीतेच्या भूमिकेत दिसत आदिपुरुष चित्रपटातील दोन अभिनेते देखील या पोस्टमध्ये दिसत आहेत. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा आदिपुरुष या चित्रपटात रामभक्त हनुमानाची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता सनी सिंह हा लक्ष्मण ही भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाच्या यशासाठी आठवड्याच्या सुरुवातीलाच ओम राऊत थेट वैष्णो देवी मंदिरात गेले. चित्रपटाच्या प्रमोशनला अधिकृतपणे सुरुवात करण्यापूर्वी दिग्दर्शकाने निर्माता भूषण कुमार यांच्यासह प्रसिद्ध मंदिरात प्रार्थना केली. हा चित्रपट आधी याचवर्षी जानेवारीत रिलीज होणार होता. तथापि, खराब गुणवत्तेच्या VFX बद्दल भरपूर प्रतिक्रिया आणि ट्रोल झाल्यानंतर, रिलीजची तारीख पुढे ढकलली गेली.

‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच या चित्रपटातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला. अनेकांनी सैफच्या लूकवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

आदिपुरुष हा चित्रपट आहे हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहेत. 500 कोटींच्या बजेटमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभासचा ‘आदिपुरुष’ आधी 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणाने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज करण्यात येईल असे सांगण्यात आले. पण अखेर आता हा सिनेमा येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे सुद्धा वाचा :

श्रीराम नवमी 2023: श्रीराम जन्मोत्सवाच्या ‘या’ खास गोष्टी जाणून घ्या..

‘जय श्री राम’ बोलला नाही म्हणून इमामावर प्राणघातक हल्ला!

अयोध्येतील राम मंदिर उभारणीत महाराष्ट्राचे देखील योगदान!

Team Lay Bhari

Recent Posts

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

40 mins ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

1 hour ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

1 hour ago

त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात

चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty's wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर…

2 hours ago

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय…

2 hours ago

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

18 hours ago