35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनकॅप्टन कुल दिसणार योद्धाच्या भूमिकेत

कॅप्टन कुल दिसणार योद्धाच्या भूमिकेत

टीम लय भारी

क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घातल्यानंतर आता कॅप्टन कुल नव्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार एमएस धोनी आता लवकरच एका ग्राफिक नॉवेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धोनी एंटरटेनमेंटने पौराणिक Si-Fi वेब सीरिज तयार केली आहे. ‘अथर्व: द ओरिजिन’ असं या ग्राफिक नॉवेलचं नाव असून, धोनीने स्वतः ही माहिती फेसबुकच्या माध्यामातून दिली आहे(Captain cool will appear in role of a warrior through graphic novel).

धोनीने शेअर केलेल्या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये धोनी युद्धभूमीवर अॅनिमेटेड अवतारात दिसून येत आहे. या अॅनिमेटेड अवतारात तो राक्षसासारख्या सैन्याविरुद्ध लढताना दिसून येत आहे. धोनीच्या या ग्राफिक नॉवेलचे लेखक रमेश थमिलमणी असून, या नॉवेलची निर्मीती विरझु स्टुडिओज आणि मिडास डील्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे(Captain Cool Dhoni appears in an animated avatar on the battlefield in the First Look video).

https://fb.watch/aXoeQkb0kq/

2020 मध्ये या ग्राफिक कादंबरीची घोषणा करण्यात आली होती. धोनीची पत्नी साक्षी ही धोनी एंटरटेनमेंटची व्यवस्थापकीय संचालक आहे.दरम्यान, ही मालिका थरारक असेल असे तिने सांगितले होते(graphic novel was announced in 2020).

मात्र, धोनीच्या या नव्या इनिंगमुळे त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असून अथर्वच्या प्रदर्शनाची आतुरतेने प्रेक्षक वाट पाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅकविषयी जय शाह यांनी विराट- रोहितशी केली होती चर्चा

महेश मांजरेकरांच्या ‘पांघरूण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Dhoni becomes a superhero! Seeing the fans jump with joy

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी