मनोरंजन

पाहुणं जेवला का? म्हणताच 25 लोक शेडसोबत कोसळले; गौतमी पाटील पुन्हा चर्चेत

मागील काही महिन्यांत गौतमी पाटीलच्या लोकप्रियतेत अफाट वाढ झाली आहे. डान्सर गौतमी पाटील तमाशाची गाणी तसेच उडत्या चालीच्या गाण्यांवर दिलखेचक अदा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेक कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेऊन गौतमी पाटील गावोगावी डान्स करण्यासाठी जाऊ लागली आहे. नुकताच गौतमी पाटीलचा एक कार्यक्रम महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जिल्ह्यात झाला. या कार्यक्रमाला चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. मात्र कार्यक्रम सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली. पाहुणं जेवला का? या गाण्यावर नाचत असताना स्टेज परिसरातील जवळच्या शेडवर बसून कार्यक्रमाचा आनंद लुटणारे 25 लोक शेडसोबत धाडकन खाली कोसळले. या धक्कादायक घटनेमुळे थोडा वेळ कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगरात 8 मे रोजी वैजापूरच्या महालगाव येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम भरला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता. कार्यक्रम बघण्यासाठी मिळेल त्या जागेवर बसून किंवा उभे राहून प्रेक्षक गौतमी पाटीलच्या डान्सचा आनंद घेत होते. काही प्रेक्षक तर एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडवर दाटीवाटीने गोळा झाले होते. टाळ्या आणि शिट्या वाजवत उपस्थित प्रेक्षक प्रतिसाद देत होते. मात्र अचानक भार जास्त झाल्यामुळे पत्रा वाकला आणि कोसळला आणि पत्र्याच्या शेडवर बसलेले प्रेक्षक धाडकन जमिनीवर पडले. या अनपेक्षित घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा: 

गौतमी पाटीलला झाली लगीनघाई!

गौतमी पाटील म्हणते, प्रेक्षक माझ्यावर; अन् इंदूरीरकर महाराजांवर प्रेम करतात

गौतमी पाटीलची लावणी महाराष्ट्राची नाही; डॉ. चंदनशिवे यांचा दावा

Gautami Patil, Gautami Patil viral, Gautami Patil Lavani dance, Gautami Patil Sambhaji Nagar Program Shed collapsed in Vaijapur

Team Lay Bhari

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

8 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

8 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

8 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

9 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

9 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

10 hours ago