29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रगौतमी पाटीलला झाली लगीनघाई!

गौतमी पाटीलला झाली लगीनघाई!

नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलने आजवर अनेकदा आई-वडील आणि शिक्षणाबद्दल सांगितलं आहे. पण आता पहिल्यांदाच तिने लग्नाबद्दल आणि जोडीदाराविषयीच्या अपेक्षांबद्दल भाष्य केलं आहे.

नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचं नाव अल्वावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झालं आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने गौतमी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. गौतमी पाटीलवर एकीकडे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पण तरीही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला राडा होत असतो. पण तरीही तरुण मंडळी तिच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दरम्यान गौतमीच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रत्येक चाहत्याला रस आहे. आता नुकतचं एका मुलाखतीत गौतमीने पहिल्यांदाच लग्नाबाबत भाष्य केलं आहे.

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली,”माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. बाबाचं लवकर निधन झालं त्यानंतर घरी कोणीच पुरुष नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे”.

गौतमी पुढे म्हणाली,”मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. आता मी 25 वर्षांची असून माझं लग्न झालेलं नाही. पण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे”.

हे सुद्धा वाचा: 

गौतमी पाटील म्हणते, प्रेक्षक माझ्यावर; अन् इंदूरीरकर महाराजांवर प्रेम करतात

धक्कादायक: लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा MMS लीक; राज्य महिला आयोगाने घेतली दखल

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ हभप शुभम महाराज माने; व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

रुपेरी पडद्यावर झळकणार गौतमी!
गौतमी पाटील आपल्या डान्समध्ये अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका होतो. पण तरीही तिने आपल्या अदाकारीने सर्वांना वेड लावलं आहे. गौतमीची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असली तरीही तिने यासर्व गौष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या डान्सवर फोकस ठेवला आहे. गौतमीचा ‘घुंगरु’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Gautami Patil marrige plan, Gautami Patil said i want to get married soon, Gautami Patil viral

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी