31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रगौतमी पाटील म्हणते, प्रेक्षक माझ्यावर; अन् इंदूरीरकर महाराजांवर प्रेम करतात

गौतमी पाटील म्हणते, प्रेक्षक माझ्यावर; अन् इंदूरीरकर महाराजांवर प्रेम करतात

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांनी अलीकडेच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मानधनावरून जाहीर कीर्तनातून टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज देशमुख यांनी अलीकडेच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या मानधनावरून जाहीर कीर्तनातून टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळत गौतमी पाटीलने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. त्यामुळेच कार्यक्रमाला प्रेक्षक खूप येतात, कार्यक्रम बघतात, आनंद घेतात. मी याबाबत बोलण्यासाठी फारच लहान आहे. माझ्या कार्यक्रमाच्या आयोजकांना माझं मानधन किती आहे हे माहिती आहे. 3-4 गाण्यांसाठी 3 लाख रुपये हे जरा जास्तच आहेत. असं कसं होणार, असं असेल तर लोक मला बोलावणार नाहीत. अनेक लोकांप्रमाणे मी सुद्धा महाराजांची फॅन आहे, असे म्हणत गौतमीने इंदुरीकर महाराजांनी मानधनाविषयी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळलं आहे.

“इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं की, मी एका कार्यक्रमासाठी तीन लाख रुपये घेते. मात्र, मी एवढं मानधन घेत नाही. मी त्यांनी नेमकं काय म्हटलं हे अजून नीट ऐकलं नाही, तसेच आमच्या टीममध्ये 11 मुली आहेत. आमची एकूण 20 जणांची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नसल्याचं गौतमी पाटीलने सांगितले आहे”.

त्याचबरोबर मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. जेवढं माझ्यावर प्रेक्षकांचं प्रेम आहे, महाराजांवरही तेवढंच प्रेक्षक प्रेम करतात. असे म्हणत, गौतमीने इंदुरीकरांबद्दल आदर व्यक्त केला. मी आगामी घुंगरू चित्रपटात नृत्यांगनेच्या जीवनावर आधारित भूमिका केली आहे. पुढील काळात नक्कीच समाज सुधारणा बद्दल कामं करण्याची इच्छा असल्याचे गौतमी पाटीलने सांगितले आहे.

इंदुरीकर महाराज काय म्हणाले होते?
“आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही,” असं इंदुरीकर महाराज एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

हे सुद्धा वाचा: 

Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ हभप शुभम महाराज माने; व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

धक्कादायक: लावणी सम्राज्ञी गौतमी पाटीलचा MMS लीक; राज्य महिला आयोगाने घेतली दखल

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल!

 

Gautami Patil said fans love Indurikar Maharaj and MeIndurikar Maharaj, Gautami Patil, Three Lakhs For Three Songs

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी