मनोरंजन

‘Nayyara Noor : भारतात जन्मलेली पाकिस्तानची बुलबुल ‘नय्यारा नूर’ यांचा आवाज हरपला

संपूर्ण जगात ‘बुलबुल-ए-पाकिस्तान’ या नावाने ओळख असलेल्या पाकिस्तानच्या मशहूर गायिका ‘नय्यारा नूर’ यांचे आज निधन झाले. नूर या 71 वर्षांच्या होत्या. त्यांना कर्करोग झाला होता. त्यांच्यावर दीर्घकाळ कराचीमध्ये उपचार सुरु होते. ‘वो जो हम में तुम में करार था’, ‘तुम्हें याद हो कि ना याद हो’, ही त्यांची गाणी प्रचंड लोकप्र‍िय आहेत. पाकिस्तानातच नव्हे तर, भारत आणि दक्षिण आशियामध्ये त्या लोकप्र‍िय आहेत. 2012 मध्ये त्यांनी गाणे कायमचे सोडले. यांचे भारताशी गाण्याच्या माध्यमातून घनिष्ट नाते होते. भारतामधील भजन ऐकता ऐकता त्या संगीताच्या प्रेमात पडल्या.

‘रुठे हो तुम तो तुमको कैसे मनाऊं पिया’, ‘तुम मेरे पास रहो’ ही गाणी रसिकांच्या तोंडावर रेंगाळतात. त्यांचा जन्म भारतामधील आसाममध्ये झाला. त्यांचे वडील ऑल इंडिया मुस्ल‍िम लीगचे सभासद होते. त्यांचे बालपण आसाममध्ये गेले. त्यांच्या घरासमोर लहान मुली सकाळी घंटी वाजवायच्या आण‍ि भजन गायच्या. ते ऐकून मी गाणे गुणगुणत असे. त्यातूनच मी गाणे शिकले असे त्यांनी पूर्वी मुलाखतीमध्ये सांगितले हाेते. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब हे पाकिस्तानमध्ये गेले.

हे सुद्धा वाचा

Ashtavinayak Darshan: अष्टविनायक दर्शन – पहिला ‘गणपती’ कऱ्हेच्या तीरावरचा ‘मोरेश्वर’

Jayant Patil : जयंत पाटील यांनी व‍िधानसभा अध्यक्षांवरच डागली तोफ !

Ajit Pawar : फडणवीसांचे म‍ित्र प्रेम,अजित पवारांकडेच ‘देवगिरी’ बंगल्याच्या चाव्या

त्यांचा जन्म 1950 मध्ये झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 10 वर्षांनी त्यांची आई त्यांना घेऊन कराचीमध्ये गेली. त्यानंतर ते पाकिस्तानमध्येच राहू लागले. मात्र त्यांचे वडील 1993 पर्यंत आसामध्येच राहत होते. नूर यांना लता मंगेशकर, बेगम अख्तार आणि कानन देवीची गाणी खूप आवडत होती. त्यांना लाहौर येथे यूथ फेस्टिवलमध्ये पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली. कॉलेजमध्ये त्या मैत्रिणींसोबत गात होत्या. त्या गाणे शिकण्यासाठी गेल्या नाहीत. त्या रेडीओ ऐकून गाणे श‍िकल्या. बेगम अख्तर यांच्या गजल ऐकण्याचे त्यांना प्रचंड वेड होते.

कॉलेजच्या स्पर्धेत लाहौर येथे त्यांनी सुवर्णपद मिळवले. त्यावेळी प्रोफेसर अहमद यांनी त्यांची प्रतिभा ओळखली. त्यांनी त्यांना पुढे येण्यासाठी मदत केली. त्यानंतर त्या पाकिस्तानच्या रेडिओसाठी गाऊ लागल्या. 1971पासून त्यांनी पाकिस्तानच्या रेडीओवर गायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘घराना’ ‘तानसेन’ या चित्रपटासाठी गायले. नय्यार नूर यांना 1973 मध्ये पाकिस्तानचा ‘निगारा’ पुरस्कार मिळाला. त्या रोज दोन तास रियाज करायच्या. त्यांचा विवाह गायक शायर जैदी यांच्या बरोबर झाला. ते एक उत्तम अभ‍िनेता देखील होते. त्यांना दोन मुलगे आहेत. त्यांचा मुलगा जाफद जैदी हे पाकिस्तानमधील फेमस कंम्पोजर आणि गायक आहेत.

रूपाली केळस्कर

Recent Posts

जाहिरातीच्या होर्डिंगसाठी दुर्मिळ झाडाची छाटणी; पर्यावरण प्रेमींचा संताप

रविवारी पाच मे रोजी सकाळी मायको सर्कल येथील चौकातील अनेक वर्षांपासून असलेले जुने पिंपळ, चिंचेच्या…

29 seconds ago

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (SMBT hospital )आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण शक्य झाली . तर एन्डोस्कोपी,…

18 mins ago

उन्हाळ्यात ब्रोकोली खाण्याचे फायदे

ब्रोकली (broccoli) उन्हाळ्यात (summer) खाल तर अनेक समस्या दूर होतील. उन्हाळ्यात ब्रोकलीचा आहारात समावेश केल्यावर…

46 mins ago

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.…

2 hours ago

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे.…

2 hours ago

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

2 hours ago