30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमनोरंजनलागिरं झालं जी मधील अज्या झळकणार 'सोयरीक' या आगामी मराठी चित्रपटात

लागिरं झालं जी मधील अज्या झळकणार ‘सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात

टीम लय भारी

‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन शोमधून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता नितीश चव्हाण आगामी ‘सोयरिक’ या मराठी चित्रपटातून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात पदार्पण करणार आहे. सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण आणि मानसी भवाळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे(Lagir Zala Ji fame actor will seen in the upcoming Marathi movie ‘Soyrik’).

‘सोयरीक’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच समाज माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला असून 11 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नातं’.. म्हणायला जेवढा सोपा शब्द आहे तेवढाच जपायला कठीण आहे. मग तो जपताना त्यात सुरू होते ती स्वार्थ अन निस्वार्थची लढाई. ह्यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच आगामी सोयरीक चित्रपटात मांडण्यात आल्याचे दिग्दर्शक मकरंद माने सांगतात(poster of his upcoming film ‘Soyrik’ was recently displayed on social media).

‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘सोयरीक’ या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण आणि मानसी भवाळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. ‘सोयरीक’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून 11 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे सुद्धा वाचा 

महेश मांजरेकरांच्या ‘पांघरूण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अक्षय कुमार शूट करणार Ram Setu चा अंडरवॉटर सीक्वेन्स, बोलावली इंटरनॅशनल टीम

Zombivli Critics Review: Amey Wagh And Lalit Prabhakar Film Is Brave Attempt In Marathi Cinema

मकरंद माने लिखीत दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित ‘सोयरीक’या कौटुंबिक धाटणीच्या मनोरंजक चित्रपटात नामवंत कलाकार पहायला मिळणार आहे. दिग्दर्शक मकरंद माने यांनी नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत. ‘सोयरीक’ मध्येही ते नात्यांबद्दल मंथन घडवणार आहेत. या चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी तर संकलन मोहित टाकळकर यांचे आहे.

वैभव देशमुख यांच्या गीतांना विजय गवंडे यांचे संगीत आहे. अजय गोगावले यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन विट्ठल पाटील तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. वेशभूषा अनुतमा नायकवडी तर रंगभूषा संतोष डोंगरे यांनी केली आहे. सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी