मनोरंजन

सिनेसृष्टीवर शोककळा: प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड

प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज पहाटे 67 व्या वर्षी निधन झालं. यासंदर्भात अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून माहिती दिली. सतीश कौशिक यांची ओळख गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता, दिग्दर्शक निर्माते अशी होती. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनुपम खेर यांनी ट्विट करत, मृत्यू हे या जगाचं अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असं म्हटलं आहे. (Famous actor, director Satish Kaushik passed away)

वयाच्या ६७ व्या वर्षी सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी याची पुष्टी केली आहे. “मृत्यू हे या जगातील अंतिम सत्य आहे. पण मी माझ्या हयातीत हे आपले खास मित्र सतीश कौशक यांच्याबद्दल लिहिन याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. ४५ ववर्षांच्या मैत्रीवर अचानक पूर्णविराम. सतीश, तुझ्याशिवाय माझं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल. ओम शांती,” असं अनुपम खेर यांनी म्हटलंय.


१३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणाच्या महेंद्रगड येथे जन्मलेल्या सतीश कौशिक यांनी १९८३ मध्ये आलेल्या ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. १९९३ मध्ये ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या जगतात पाऊल ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केले. सतीश कौशिक यांनी प्रत्येक जॉनरमध्ये काम केलं.

एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच ते स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. राम लखन, साजन चले ससुराल अशा अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय साकारला आहे. ते लवकरच कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकणार होता. काही काळापूर्वी त्यांचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता.

हे सुद्धा वाचा :

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी आजारी असल्याचे समजताच एकनाथ शिंदे आले धावून

घरगुती हिंसाचाराप्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला थेट पाकिस्तानातून समर्थन

‘जेव्हा कॉस्मेटिक सर्जरी केली तेव्हा धक्काच बसला !’ प्रियांका चोप्राने सांगितला थरारक किस्सा

Team Lay Bhari

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

4 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

4 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

5 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

5 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

11 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

12 hours ago