33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमनोरंजन'जेव्हा कॉस्मेटिक सर्जरी केली तेव्हा धक्काच बसला !' प्रियांका चोप्राने सांगितला थरारक...

‘जेव्हा कॉस्मेटिक सर्जरी केली तेव्हा धक्काच बसला !’ प्रियांका चोप्राने सांगितला थरारक किस्सा

प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मापासून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल खुलेपणाने बोलल्या आहेत. आता पुन्हा एकदा बॉलिवूडची सुप्रसिद्ध नायिका प्रियांका चोप्रा हिने तिच्या शस्त्रक्रियेबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्रींच्या स्टाईल आणि ड्रेसिंगला आजकाल मोठ्या प्रमाणावर फॉलो केले जाते. त्यामुळेच बॉलीवूड स्टार्स त्यांच्या लूकबाबत नेहमीच सतर्क असतात. आपल्या सौंदर्यासाठी लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या नायिकांची स्टाईल लोक स्वतःही स्वीकारतात. पण अभिनेत्री त्यांच्या शरीर आणि लुकबाबतही खूप जागरूक असतात. अनेक नायिका त्यांच्या लूकसाठी शस्त्रक्रिया करण्यापासून मागे हटल्या नाहीत. प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मापासून अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल खुलेपणाने बोलल्या आहेत. आता पुन्हा एकदा बॉलिवूडची सुप्रसिद्ध नायिका प्रियांका चोप्रा हिने तिच्या शस्त्रक्रियेबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे.

प्रियंका चोप्राने तिच्या शस्त्रक्रियेचा एक वेदनादायक किस्सा शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रियंका चोप्राने नाकाच्या शस्त्रक्रियेदरम्यान काहीतरी चूक झाल्याचे सांगितले होते. यामुळे प्रियांका चोप्राचा लूक पूर्णपणे बदलला होता. प्रियांका तिच्या कॉस्मेटिक सर्जरीबद्दल उघडपणे बोलली आहे. प्रियांका चोप्राने तिच्या नाकातील पोकळीसाठी कॉस्मेटिक सर्जरी केली होती. शस्त्रक्रियेनंतर प्रियांकाचा लूक पूर्णपणे बदलला होता. यामुळे प्रियांका आणि तिची आईही खूप घाबरली होती.

हे सुद्धा वाचा

हा महिला दिन ‘त्या’ महिलांना समर्पित…; महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट

नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं !

विधिमंडळ हक्कभंग नोटीशीला संजय राऊत यांचे उत्तर; माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच…

कारकिर्दीच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया केली होती
प्रियांका करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात होती. यासोबतच या काळात वाढत्या करिअरबाबतही चिंता वाढली होती. प्रियांकाने स्वत: तिच्या कॉस्मेटिक सर्जरीबद्दल लिहिले की, ‘जेव्हा डॉक्टर माझ्या पॉलीपची शस्त्रक्रिया करत होते, तेव्हा माझ्या नाकाचा एक भाग चुकून कापला गेला. यामुळे माझा लूक खूप बदलला. बँडेज काढल्यावर माझ्या आईलाही धक्का बसला. माझ्या नाकाचा नैसर्गिक देखावा निघून गेला होता. माझ्यासमोर एक नवीन रूप आले होते.’ त्यावेळी आपल्याला आँणि आपल्या आईला मोठा धक्का बसला असल्याची कबूलीही यावेळी प्रियांकाने दिली.

बॉलीवूडमध्ये या नायिकांवर शस्त्रक्रिया झाली
प्रियांका चोप्रा ही एकमेव बॉलिवूड स्टार नाही जिने शस्त्रक्रिया केली आहे. याआधीही अनेक हिरोईनवर शस्त्रक्रिया झाल्याच्या बातम्या मीडियात आल्या आहेत. अनुष्का शर्माही या शस्त्रक्रियेबाबत खुलेपणाने बोलली आहे. अनुष्कासोबतच कतरिना कैफ, शिल्पा शेट्टी यांसारख्या अनेक हिरोईनच्या सर्जरीच्या बातम्याही चर्चेत आहेत. शस्त्रक्रियेनंतर प्रियांका चोप्राच्या करिअरलाही बराच फायदा झालेला दिसत आहे. यासोबतच सर्जरीनंतर प्रियांकाचा लूकही खूप बदलला आहे. प्रियांका चोप्रा आता हॉलिवूडमध्येही नाव कमावत आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये यशाचे शिखर गाठणारी प्रियंका आता हॉलिवूड चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी