मनोरंजन

Shivpratap Garudzep : शिवरायांची ‘गरुडझेप’ ओटीटीवर दिसणार!

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार्‍या चित्रपट आणि वेब सिरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. मनोरंजनाच्या या नव्या रुजणार्‍या व्यासपीठावर अधिराज्य गाजवण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या डॉ.अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपल्या यशाची पताका फडकवली. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक पसंतीची जोरदार पावती मिळवल्यानंतर आता ‘टीएफएस प्ले’ (TFS PLAY ) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाची गर्जना घुमणार आहे. शुक्रवार 4 नोव्हेंबरला या चित्रपटाचा वर्ल्ड वाईड ओटीटी प्रिमियर ‘टीएफएस प्ले’ (TFS PLAY) या ऍपवर रंगणार आहे. ‘टीएफएस प्ले’ फ्री डाऊनलोड ॲप असून या ॲपवर अवघ्या 99 रूपयांत आपल्याला हा चित्रपट पाहता येईल.

या प्रदर्शनाबाबत डॉ अमोल कोल्हे सांगतात की, आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोठया पडद्यानंतर ओटीटीवर ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचा प्रिमियर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक माध्यमाची स्वतःची ताकद आणि ओळख आहे. ओटीटीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : मुंबई पुन्हा हाय अलर्टवर; हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट

Maharashtra News : शिंदे सरकारच्या काळात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे फावले; पुन्हा सेवेत रुजू

Mumbai News : सीताराम कुंटे अन् इक्बाल चहल यांना न्यायालयाचे समन्स; कोरोना लसीकरणात भेदभावाचा आरोप

टीएफएस ओरिजिनल हा पहिला कौटुंबिक ओटीटी प्लॅटफॉर्म असून स्क्रीन मिररिंगचा पर्याय यासाठी उपलब्ध असल्याने मोबाईलवरून आपल्या स्मार्ट टीव्हीवरही पाहता येऊ शकतो. ॲपल आणि ॲड्रॉइड टीव्हीवर देखील ‘टीएफएस प्ले’ उपलब्ध आहे.

‘जगदंब क्रिएशन्स’ची निर्मिती असलेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

प्रणव ढमाले

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

7 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

8 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

8 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

8 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

8 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

12 hours ago