मनोरंजन

Riteish-Genelia New Movie : रितेश देशमुखकडून जेनेलियाला खास पाडवा गिफ्ट

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही चित्रपट सृष्टीतील अशी जोडी आहे, ज्यांचे अनेक चाहते आहेत. हे नवरा-बायको कायमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या आणि लोकांच्या संपर्कात असतात. रितेश आणि जेनेलिया नेहमीच सोशल मीडियावर रिल्स बनवत असतात. जे त्यांच्या चाहत्यांना सुद्धा खूप आवडतात. रितेश आणि जेनेलियाच्या चाहत्यांनाच नाही तर अनेक लोकांना नेहमीच या नवरा-बायकोला एकत्र पाहायला आवडते. त्यांचे अनेक जुने चित्रपट आजही लोक तितक्याच आवडीने पाहतात. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर रितेशने जेनेलियासोबतच त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने रितेश देशमुखने त्यांच्या नव्या चित्रपटाची (New Movie) घोषणा केली आहे. ‘वेड’ (Ved) असे रितेश देशमुखच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात जेनेलिया देशमुखने महत्वाची भूमिका साकारलेली आहे.

जेनेलिया देशमुख ही पहिल्यांदाच ‘वेड’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे. याआधी जेनेलियाने हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तिन्ही भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. पण आता पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्री म्हणून जेनेलिया या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेड’ या चित्रपटाची घोषणा रितेश देशमुखने ट्विटरच्या माध्यमातून केली. यावेळी रितेशने चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित केले.

‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचं #वेड तुमच्यापर्यंत येतंय 30 डिसेंबरला.. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.’ असे ट्विट करत रितेशने ‘वेड’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील स्वतः रितेश देशमुख यानेच केले आहे.

रितेशने वेड या चित्रपटाचे तीन पोस्टर यावेळी सोशल मीडियावर प्रदर्शित केले. या पोस्टरवर रितेश धूम्रपान करताना दिसून येत आहे. तर जेनेलियाच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव या पोस्टरमधून दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटातून नेमके कोणते ‘वेड’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ? याची उत्सुकता आता निर्माण होऊ लागली आहे. या चित्रपटाला मराठी चित्रपट सृष्टीचे सर्वोत्कृष्ट संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. 30 डिसेंबर म्हणजेच यंदाच्या वर्षीच्या अखेरीस हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा

Bollywood Diwali : बॉलिवूड सिताऱ्यांची झगमगीत दिवाळी, पाहा फोटो

Priyanka Chopra Diwali With Daughter : प्रियांका अन् निकने मुलीसोबत साजरी केली पहिली दिवाळी! पाहा फोटो

Siddhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणात जोडले गेले प्रसिद्ध गायिकेचे नाव

जेनेलिया देशमुख हिने सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. ‘माझा जन्म महाराष्ट्रातलाच.मी अभिनयाला सुरवात केल्यानंतर हिंदी-तमिळ-तेलगू अशा विविध भाषांमधून चित्रपट केले.तिथे रसिक प्रेक्षकांचं उदंड प्रेम मला मिळालं. रितेशच्या पहिल्या दिग्दर्शनाद्वारे मी मराठीत चित्रपटात पदार्पण करतेय. मराठीत काम करतांना मला एक वर्तूळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय.’ असं म्हणत जेनेलियाने देखील ‘वेड’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेत. तुम्ही मराठीतही मला तितकंच प्रेम द्याल ही खात्री आहे, अशी आशा देखील जेनेलियाने यावेळी व्यक्त केली आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचे २०१२ मध्ये लग्न झाले. त्यांना रिआन आणि राहील नावाची मुले आहेत. ते कायमचं आपल्या मुलांसोबत दिसून येतात. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत, जे नेहमी त्यांच्या मुलांच्या कृतीतून दिसून येत असतात. रितेश आणि जेनेलिया ही चित्रपट सृष्टीतील आदर्श जोडी आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र एकाच चित्रपटात काम करताना पाहण्याची उत्सुकता मात्र आता सर्वांना लागलेली आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

2 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

3 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

5 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

5 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

6 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

6 hours ago