मनोरंजन

The Kerala Storyचा बॉक्स ऑफिसवर धुव्वा; वादग्रस्त ठरूनही करतोय कोटींची कमाई

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाचे शो काही ठिकाणी बंद पाडण्यात आले होते. मात्र वाद आणि विरोध होत असताना देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट 2023 सालच्या टॉप 5 ओपनिंग लिस्ट मध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनने शेहजादा आणि द काश्मीर फाइल्स सारख्या चित्रपटांना मागे टाकले. केवळ 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने मोठ्या व्यावसायिक चित्रपटांना मागे टाकले आहे. केरळ स्टोरी 2023 मधील पाचव्या सर्वात मोठ्या ओपनिंग करणार चित्रपट ठरला आहे.

अनेक वादविवाद, विरोधानंतर द केरळ स्टोरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय याकडे समीक्षकांचं लक्ष वेधलं होतं. विशेष म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही तो वादात सापडला. या सिनेमात अनेक खोटे दावे करण्यात आहे. परंतु, अनेक संकट पार करत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजू लागला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु केली असून दुसऱ्या दिवशीही त्याने बक्कळ कमाई केली आहे.

सुदिप्तो सेन दिग्दर्शिक द केरळ स्टोरी या सिनेमाने पहिल्या दिवशी 7.5 कोटींची कमाई केली. त्यामुळे या सिनेमाने पहिल्याच दिवशी दणक्यात ओपनिंग केली. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशीही हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या सिनेमाने दुसऱ्या दिवशी चक्क 12.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, सुदीप्तो सेन यांचा ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करत अनेकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. या सिनेमात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.

हे सुद्धा वाचा: 

तब्बल 15 वर्षांनंतर आमिर करतोय ‘गजनी’च्या सिक्वेलची तयारी!

वडील व्हायचे होते पण…; वैयक्तिक आयुष्याबाबत सलमानचा मोठा खुलासा

टांझानियातही ‘बहरला हा मधुमास’; पाहा व्हिडीओ

The Kerala Story, The Kerala Story smashes at the box office; Earning crores despite being controversial

Team Lay Bhari

Recent Posts

त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात

चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty's wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर…

15 mins ago

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय…

29 mins ago

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

16 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

17 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

17 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

18 hours ago