मनोरंजन

Tiger 3 Poster Out : सलमानच्या नव्या लूकने घातली चाहत्यांना भुरळ! टायगर 3 चित्रपटाचा पोस्टर आऊट

सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3’ बद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट बदलली आहे. हा चित्रपट आधी 2023 च्या ईदला रिलीज होणार होता, पण आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. खुद्द सलमान खान आणि यशराज फिल्म्सने याची घोषणा केली आहे. यासोबतच या चित्रपटातून सलमानची एक पोस्टही शेअर करण्यात आली आहे. ‘टायगर 3’चे हे पहिले पोस्टर असून त्यात सलमानची थोडीशी झलक पाहायला मिळत आहे. सलमानची ही झलक त्याच्या चाहत्यांनी जोरदार शेअर केली आहे. त्यामुळे हा पोस्टर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सलमाने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याचे डोळे आणि कपाळ दिसत आहे. त्याचा चेहरा कापडाने झाकलेला आहे. पोस्टरवर दिवाळी 2023 असे लिहिले आहे. पोस्टर शेअर करताना सलमानने लिहिले, “टायगरची नवीन रिलीज डेट आहे, दिवाळी 2023 आहे. मोठ्या पडद्यावर यशराज फिल्म्स (वायआरएफ) ला 50 वर्ष झाल्याच्या आनंदात टायगर 3 साजरी करा. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होईल.”

हे सुद्धा वाचा

Thane Roads Closed : रस्त्याच्या कामासाठी ठाण्यातील रस्ते बंद! ‘या’ पर्यायी मार्गांचा वापर करा

Joe Biden : अखेर भारताचे म्हणणे अमेरिकेने मान्य केले! जो बायडन म्हणाले, ‘पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक देश’

Supreme Court Decision : जीएन साईबाबांची सुटका नाहीच! सर्वोच्च न्यायालयाने नागपूर हायकोर्टचा निर्णय फेटाळला

वायआरएफ ने देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अशीच एक पोस्ट केली आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कतरिना कैफने लिहिले की, “‘टायगर आणि झोया 2023 च्या दिवाळीला येत आहेत.” ‘टायगर 3’ हा ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’चा सिक्वेल आहे. हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. चित्रपटांमध्ये सलमान भारतीय गुप्तहेर अविनाश सिंग ‘टायगर’ राठौरची भूमिका साकारत आहे. त्याच वेळी तो, कतरिना कैफचे पात्र असणाऱ्या पाकिस्तानी गुप्तहेर झोया हुमैमीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासोबत लग्न करतो.

 

‘टायगर 3’मध्ये शाहरुखचा कॅमिओ
शाहरुख खानही ‘टायगर 3’मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. तर सलमान ‘पठाण’मध्ये टायगरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘पठाण’ हा शाहरुखच्या आगामी चित्रपटात आहे. दोन्ही चित्रपट ‘पठाण’च्या माध्यमातून एक विश्व निर्माण करत आहेत. त्यानंतर शाहरुख आणि सलमान मोठ्या पडद्यावर एकत्र काम करतील अशी शक्यता आहे.

सलमान आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे
सलमान खान आणि शाहरुख खान हे दोघेही सध्या आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. जिथे सलमान ‘बिग बॉस 16’ तसेच ‘किसी का भाई किसी की जान’चे शूटिंग करत आहे. दुसरीकडे, शाहरुखने अलीकडेच एटलीस ‘जवान या त्याच्या आगामी चित्रपटाचे चेन्नईचे शुटींग पूर्ण केले आहे.

प्रणव ढमाले

Recent Posts

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

7 mins ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

40 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

5 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago