मनोरंजन

Viral Video : पाकिस्तानी अभिनेत्रीची नेटकऱ्यांनी केली धुलाई

सिनेकलाकारांविषयी सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते. कलाकार त्यांच्या वयक्तिक आयुष्यात नेमकं काय करतात याकडे ते लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं जितकं ते कौतुक करतात, तितकंच एखादी त्यांनी चूक केल्यास त्यांना ट्रोल करून हैराण सुद्धा करतात. 90 च्या दशकातील पाकिस्तानी अभिनेत्री रेशम सध्या नेटकऱ्यांकडून चांगलीच ट्रोल होत आहे. अभिनेत्री रेशमचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे, त्यामध्ये रेशम माशांना खाद्य देत असल्याचे दिसून येत आहे त्यावेळी खाद्याची प्लास्टिक बॅगसुद्धा पाण्यात टाकलेली दिसत असल्याने नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला चांगलेच फैलावर घेतले आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री रेशमचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. ही अभिनेत्री कायमच गरजूंना मदत करत असल्याने ती कायम अनेकांकडून नावाजली जाते, परंतु यावेळी असे काही घडले की नेटकऱ्यांनी थेट रेशमची शाब्दिक धुलाई केली आहे. नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा रेशमने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यामध्ये रेशम माशांना खाद्य देत असताना दिसत आहे. खाद्य म्हणजेच ब्रेडचे तुकडे पाण्यात टाकत असल्याचे दिसत असून ते तुकडे टाकल्यानंतर ज्या प्लास्टिक बॅगमध्ये ते ठेवले होते ती प्लास्टिक बॅग सुद्धा पाण्यात टाकत असल्याचे रेशम दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा…

सीतारमण यांची भाषा बारामतीच्या जनतेला सहज समजेल – शरद पवार

Robin Uthappa Retires : रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून स्वीकारली निवृत्ती

Shivajirao Adhalarao Patil : शिंदे गटातील नेते आढळराव पाटलांच्या अडचणीत वाढ

या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी रेशमला ट्रोल करण्यास सुरू केले असून ‘रेशम ही नेहमी लोकांची मदत करते पण तिनं एक चुक केली आहे. तिनं हे जाणूनबुजून केले नाही. पण रेशमनं जे केलं ते तुम्ही करु नका.’ अशा आशयाचे कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडिओवर केले आहे. आणखी काही नेटकऱ्यांनी टीका करत ‘दिखावा करु नका’, ‘म्हणून असं म्हटलं जात, प्रत्येक कामाचा दिखावा करणं गरजेचं नाहीये.’ ‘तुमच्याकडून खूप मोठी चुक झाली आहे.’ असे म्हणून त्यांच्या या कृत्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या ट्रोलिंगनंतर अभिनेत्री रेशम यांनी पुन्हा सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर करत माझ्या करीअरमधील ही सर्वात मोठी चूक असे म्हणत माफी मागितली आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

3 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

3 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

6 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

7 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

8 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

8 hours ago