32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रसीतारमण यांची भाषा बारामतीच्या जनतेला सहज समजेल - शरद पवार

सीतारमण यांची भाषा बारामतीच्या जनतेला सहज समजेल – शरद पवार

बारामतीमध्ये निर्मला सीतारमण येणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, सीतारमण (Sitharaman) यांची भाषा बारामतीच्या जनतेला सहज समजेल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशातील आणि राज्यातील अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली. आज झालेल्या पत्रकार‍ परिषदेमध्ये अनेक गोष्टींचा त्यांनी उलगडा केला. बारामतीमध्ये निर्मला सीतारमण येणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, सीतारमण (Sitharaman) यांची भाषा बारामतीच्या जनतेला सहज समजेल. यातून अनेक अर्थ निघतात. कारण बारामतीसाठी शरद पवारांनी जे काही केले आहे. त्यामुळे बारामतीच्या लोकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. शरद पवारांचे देखील बारामतीवर प्रेम आहे. त्यामुळे पवार‍ आणि बारामती हे एक समीकरण आहे.

त्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या माणसाचा टीकाव लागू शकत नाही हे उघड आहे. त्यामुळे त्यांनी एका शब्दातच मार्मिक उत्तर दिले. केंद्रातील माणसं बारामतीमध्ये येत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे असेही ते यावेळी म्हणाले. वेदांत समूह आणि फॉक्सकॉन कंपन्या गुजरातला हलवण्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातवरण तापले आहे. या प्रकरणावरून देखील त्यांनी सरकारला मोलाचा सल्ला दिला. अनेक वेळा मोठे उदयोग येण्यासाठी सर्वांत पहिली पसंती ही महाष्ट्राला दिली जाते. कारण इथले वातावरण उदयोगांसाठी पोषक आहे. आम्ही मंत्री असतांना नेतेमंडळी अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देत होती. असे नवे प्रकल्प हे महाष्ट्राबाहेर जाणे दुदैव आहे.

आता पुन्हा एखादा प्रकल्प देवून, हे रडणाऱ्या लहान मुलाला फूगा देऊन समजूत काढण्यासारखे आहे. त्याचा आता काही उपयोग नाही. राज्य चालवणाऱ्यांनी भांडवली गुंतवणुकीला पोषक असे वातावरण तयार करायचे असते. परंतु आपल्याकडे वाद संपवण्या ऐवजी वाद वाढवण्याचे काम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांनी वाद थांबवून राज्याच्या विकासाचा व‍िचार केला पाहिजे. टीका केली पाहिजे, आवश्य करा, पण रोज करू नका. नवीन प्रकल्प कसे येतील याकडे लक्ष केंद्रीत करा. तसचे नवीन प्रकल्प आणण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

आम्ही मंत्रालयात असतांना देशातील आणि देशाबाहेरील गुंतवणूकदार यायचे त्यांच्यासाठी दोन तास वेळ दयायचो. आता सगळी यंत्रणाच थंड झालीय. मात्र राज्य चालवणारा गतीमान झालाय. आता कुठेही गेलो तरी खोका हा शब्द ऐकायला मिळतोय. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक इत्यादी राज्यात काँग्रेसची सत्ता घालवून भाजपने सत्ता स्थापन केली. दाम, दाम, दंड, भेद अशा विविध मार्गाने भाजप सत्ता स्थापन करण्याच्या मागे आहे, अशा प्रकारे अत्यंत मार्मिक शब्दात शरद पवार यांनी राज्य सरकारची कानउघडणी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी