Featured

चीनमध्ये स्थायिक भारतीय डॉक्टर म्हणताहेत, कोविड परिस्थिती अत्यंत बिकट; रोज एक कोटीहून अधिक नवे रुग्ण, स्मशानभूमींवर मोठा भार !

चीनमध्ये कोविड परिस्थिती अत्यंत बिकट आहे. (Hospitals Housefull in China) एकट्या झेजियांग प्रांतात दररोज सुमारे 10 लाख नवे रुग्ण येत आहेत. गेली अनेक वर्षे स्थायिक असलेल्या एका भारतीय वंशाच्या तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांनी हे चित्र शेअर केले आहे. ते पाहता, संपूर्ण चीनमध्ये तर रोज किमान एक कोटीहून अधिक नवे रुग्ण येत असावेत. सर्वच लहान-मोठ्या स्मशानभूमींवर मोठा भार असल्याचेही या डॉक्टरांनी म्हटले आहे.

गेली अनेक वर्षे चीनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे डॉक्टर अभिषेक कुंडू यांनी चीनमधील विद्यमान कोविड परिस्थिती शेअर केली आहे. त्यानुसार, देशभरातील रुग्णालये रूग्णांनी खचाखच भरलेली आहेत. कोविड चाचणी अतिशय कमी होत आहेत. आता फक्त रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवरच चाचण्या केल्या जात आहेत. चिनी सरकार मृत्यूची अधिकृत संख्या कमी दाखवत आहे. अनेक मृत्यूंची नोंदच जाहीर केली जात नाही. रुग्णांच्या आकडेवारीचीही लपवाछपवी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय मीडियात काही नवशिक्या व हौशी डॉक्टर्सचे, थेट चीनमधून म्हणून व्हिडिओ शेअर केले गेले होते. त्या आधारे, चीनमध्ये सबकुछ अगदी नॉर्मल आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, ही उठाठेव अगदी हास्यास्पद आणि दिशाभूल करणारी असल्याचे चीनमधून आता रोज समोर येणाऱ्या वस्तुस्थितीतून स्पष्ट होऊ लागले आहे. आठवडाभरापूर्वी रेकॉर्ड केलेला चीनचे नॉर्मल चित्र दाखविणारा नवशिक्या डॉक्टरचा व्हिडिओ हा 100% लसीकरण झालेल्या प्रांतातील, एका छोट्या उपनगरातील होता. तिथे यापूर्वीच केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे स्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे. मात्र, संपूर्ण चीनमधील परिस्थिती तशी नाही. चीनमध्ये मृत्यूचे भयानक तांडव सुरू आहे. आता जगभरातील माध्यमात वस्तुस्थिती उमटत आहे. वॉशिंग्टन पोस्ट आणि अल जजीरा सारखी जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि जबाबदार माध्यमांनी चीनमधील हाऊसफुल्ल हॉस्पिटल्स तसेच स्मशानभूमींचे व्हिडिओ जारी केले आहेत. असोसिएटेड प्रेस या जगातील अव्वल वृत्तसंस्थेने पाच रुग्णालये आणि दोन स्मशानभूमींचे लाईव्ह स्टिंग ऑपरेशन करून वास्तव जगासमोर आणले आहे.

व्यावसायिक नुकसान आणि मंदीचे सावट टाळण्यासाठी; तसेच देशातील जनजीवन सामान्य असल्याचे जगाला दाखविण्यासाठी चीन सरकारने तडकाफडकी लॉकडाऊन आणि कोविड निर्बंध उठवले आहेत. त्यानंतर परिस्थिती भीषण होऊ लागली आहे. डॉ. कुंडू राहत असलेल्या चीनच्या झेजियांग प्रांतात दररोज सुमारे 10 लाख कोविड प्रकरणे नोंदवली जात आहेत. चिनी सरकार मृत्यूची अधिकृत संख्या कमी करत असतानाही वेगवेगळ्या शहरांमधील स्मशानभूमींवर भार वाढतच चालला आहे. डॉ. अभिषेक कुंडू यांनी इंडिया टुडे टीव्हीला कालच चीनमधील ताज्या स्थितीची माहिती दिली आहे. डॉ. कुंडू म्हणाले की, सर्वत्र अत्यंत बिकट परिस्थिती आहे. रुग्णालयात खाटांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. ते कार्यरत असलेल्या रुग्णालयाच्या पहिल्या दोन मजल्यांवरच पूर्वी कोविड रुग्ण असायचे. आता तर प्रकरणे इतकी वाढली आहेत, की जवळपास चार मजले विषाणू संक्रमित रुग्णांनी भरलेले आहेत. रुग्णांना जागा अपुरी पडत आहे.

👆चीनमधील हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची खचाखच गर्दी आणि पडून असलेल्या मृतदेहांचे व्हिडिओ सोशल मीडियात आता शेअर होऊ लागले आहेत.

डॉ कुंडू यांच्या माहितीनुसार, चीन सरकारने निर्बंध उठविल्यापासून कोविड चाचणीची वारंवारताही कमी झाली आहे. आता जे लोक स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जात आहेत किंवा बाजारातून कोविड किट खरेदी करत आहेत, त्यांच्याच चाचण्या होत आहेत.

हे सुध्दा वाचा : 

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच करोना लसीचा ‘ड्राय रन’ जाणून घ्या तारीख

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा झिंगाट डान्स ! 

अमेरिकेचा माज निसर्ग उतरवतोय; हिमवादळापुढे सपशेल शरणागती; शतकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती !

दहा दिवसांपूर्वी डॉ. कुंडू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती; पण आता सर्वांची प्रकृती ठीक आहे. डॉ. कुंडू यांच्या परिसरात किमान 800 भारतीय कुटुंबे राहतात. त्यापैकी अनेकांना कोविड विषाणूचा संसर्ग झाला आहे. मात्र, ते सर्व जण बरे झाले आहेत, असा दावा या डॉक्टरांनी केला आहे.

चीनमधील नवीन कोविड लाटेसाठी जबाबदार असलेला ओमिक्रॉन बीएफ 7 हा सब व्हेरीएंट आधीच्या इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरतो; परंतु बीएफ 7 मुळे संसर्ग झालेले बहुसंख्य लोक बरे होतात, असेही डॉ. कुंडू यांनी स्पष्ट केले आहे. बीएफ 7 मुळे भारतातील कोविड प्रकरणांमध्ये फारशी मोठी वाढ होणार नाही, अशी शक्यताही डॉ. अभिषेक कुंडू यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “बहुसंख्य भारतीय लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे, अनेकांनी बूस्टर डोस देखील घेतला आहे. चीनमध्ये ज्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांनी नवीन प्रकाराविरूद्ध चांगली प्रतिकारशक्ती दर्शविली आहे.”

चीनमधील शांघाय शहरात कोविडचा प्रादुर्भाव सुरू असताना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) परिधान केलेले नातेवाईक आपल्या प्रियजनांची अंत्यसंस्कार प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रतिक्षेत उभे आहेत. (फोटो क्रेडिट : गुगल)

Hospitals Housefull in China, Dr. Abhishek Kundu, Covid Situation Worsened

 

विक्रांत पाटील

Recent Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

17 mins ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

9 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

10 hours ago

आडगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून केला पोबारा

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या…

10 hours ago

भाडेकरूचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

घर भाडेकरूंचा (Tenant dispute) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मखमलाबाद रोडवरील एका रहिवासी इमारतीमध्ये घरमालकांनी…

10 hours ago

नाशिक मध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड

ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाशिक शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या (gas…

10 hours ago