जगभराचा कारभारी असल्यागत दादागिरी करत फिरणाऱ्या बलाढ्य अमेरिकेचा माज निसर्ग उतरवतोय, अशी आज स्थिती आहे. (Snow Cyclone In America) या शक्तिशाली देशाने हिमवादळापुढे सपशेल शरणागती पत्करली आहे. हे स्नो टॉर्नेडो म्हणजे अमेरिकेवरील, या शतकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे सांगितले जात आहे.
हिमवादळाने संपूर्ण अमेरिकेत हाहाकार माजविला आहे. अनेक शहरात वीज नाही, विमान उड्डाणे रद्द होत आहेत. या बर्फाच्या तुफानात आतापर्यंत 50 हून अधिक बळी गेळे आहेत. ओहायो, कोलोरॅडो, टेनेसी आणि न्यूयॉर्कसह अमेरिकेच्या 12 राज्यांमध्ये बर्फाच्या वादळांनी कहर केला आहे. अनेक ठिकाणी तापमान उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.
अमेरिका-कॅनडा सीमेजवळील ग्रेट लेक्सपासून ते मेक्सिकोच्या सीमेवरील रिओ ग्रांडे नदीपर्यंत हिमवादळे सक्रिय आहेत. या शतकातील हे सर्वात भीषण बर्फाचे वादळ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून लाखो लोक अंधारात आहेत. अनेक शहरात वीज पुरवठा खंडित झाला आहे. याशिवाय, रस्त्यांवर सर्वत्र बर्फाची चादर असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. अनेक गाड्या बर्फाने झाकल्या जात आहेत, विमानतळांवर उभी असलेली विमानेही बर्फाने झाकलेली असतात. यामुळे आतापर्यंत 15,000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
कोलोरॅडो, इलिनॉय, कॅन्सस, केंटकी, मिशिगन, मिसूरी, नेब्रास्का, न्यूयॉर्क, ओहायो, ओक्लाहोमा, टेनेसी आणि विस्कॉन्सिन यांसारख्या किमान 12 राज्यांमध्ये तीव्र थंडीआहे. ईशान्य न्यू यॉर्क राज्यातील बफेलो शहराला वीकेंडमध्ये एक मीटरपेक्षा जास्त बर्फ पडल्यामुळे सर्वाधिक जीवितहानी झाली. थंडीमुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह गाड्यांच्या आत पडून आहेत. न्यूयॉर्कचे गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी, हे इतिहासातील सर्वात विनाशकारी वादळ असल्याचे म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा :
न्यू यॉर्कमध्ये आणीबाणी : बॉम्बने केले अमेरिकेतील जनजीवन ठप्प; तापमान उतरले -45 अंश सेल्सिअसवर!
राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
.@NOAA's Joint Polar Satellite System (#JPSS) satellites helped track the historic #ArcticBlast that left much of the U.S. in a deep freeze around the holidays. The frigid air (represented by the blue shading) was derived from the satellites' CrIS and ATMS instruments. Brrrr! pic.twitter.com/1uVeUNPDIz
— NOAA Satellites (@NOAASatellites) December 28, 2022
अमेरिकी हवामान खात्याच्या माहितीनुसार, अनेक शहरात 14 इंचांपर्यंत बर्फ जमा झाला आहे. न्यूयॉर्कसह सर्व शहरे बर्फाने झाकली गेली आहेत. कुठेही रस्ते दिसत नाहीत, अनेक ठिकाणी हिरवळही दिसत नाही. शहरेच्या शहरे जणू बर्फाच्या दुलईत गुंडाळलेली आहेत. अमेरिकेशिवाय कॅनडातीलही अनेक भागात अशीच परिस्थिती आहे. यापूर्वीही हिवाळ्यात अमेरिका आणि कॅनडामध्ये अनेकदा बर्फवृष्टी झाली आहे; पण यंदाच्या हवामानाने जुने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे ख्रिसमसच्या उत्सवावरही परिणाम झाला आहे.