35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा 'झिंगाट' डान्स ! त्यांच्या डान्सने वातावरण झाले...

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स ! त्यांच्या डान्सने वातावरण झाले हलकंफुलकं

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोविड सेंटरमधील (Covid Center) कोरोना रुग्णांना उपचारासह मानसिक आधार देण्याचे प्रयत्न विविध सेवाभावी संस्था आणि नेतेमंडळींकडून सुरु आहेत. येथील कोविड केअर सेंटरला (Covid Center) आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला (MLA Rohit Pawar signed a contract with Corona patients on Zingat song).  

रोहित पवार (Rohit Pawar) आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला (Covid Center) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काल सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला. कायमच समाजभान जपत आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या या नेत्याने त्याचे वेगळेपण जपले आहे. या संकटच्या वेळी जेव्हा आपापसांतील अंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाढत असतानाच नकळत, अनेकदा माणुसकीच्या नात्यातही दुरावा आल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु, रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यालाही शह दिला आहे.

राज्यातील लॉकडाऊन शिथील होणार?; हा असेल ठाकरे सरकारचा प्लॅन!

मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लावू नका, संभाजीराजांचे दोन्ही सरकारला आवाहन…

Delhi HC takes up plea to curb mosquito-borne diseases amid pandemic, issues notices to civic bodies

एनसीपी विधायक रोहित पवार ने कोरोना मरीजों के साथ किया डांस

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या क्षणांचा एक व्हिडीओ ही सर्वांच्या भेटीला आणला आहे. ‘गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये (Covid Center) रुग्णांमध्ये असलेले गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो’, असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत लिहिले.

कोरोना रुग्णांची सातत्याने विचारपूस

रोहित पवार (Rohit Pawar) हे सातत्याने आपल्या मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पाहायला मिळतात. वेळोवेळी विविध रुग्णालये, तसेच कोविड सेंटरला (Covid Center) भेटी देऊन ते रुग्णांशी चर्चा करताना पाहायला मिळतात. तसेच रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहिती ही ते घेत असतात. रविवारी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बारामतीमधील कोविड सेंटरला (Covid Center) भेट देत स्थितीचा आढावा घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी